Home /News /maharashtra /

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी; साताऱ्यात बापलेकाचा हृदयद्रावक शेवट

पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी लावली जिवाची बाजी; साताऱ्यात बापलेकाचा हृदयद्रावक शेवट

Crime News: सातारा तालुक्यातील कोडोली चंदननगर येथील रहिवासी असणाऱ्या बापलेकाचा एकाच दिवशी दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना समोर येताच कुटुंबीयांनी आक्रोश केला आहे.

    सातारा, 19 जानेवारी: सातारा (Satara) तालुक्यातील कोडोली चंदननगर येथील रहिवासी असणाऱ्या बापलेकाचा एकाच दिवशी दुर्दैवी अंत (Father and son death) झाला आहे. संबंधित बापलेक वाकळा धुण्यासाठी कोडोली येथील कृष्णाधाम परिसरात गेले असता, दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drown into river and died) झाला आहे. कृष्णाधाम येथील पायऱ्यांवर वाकळा धुवत असताना, मुलगा प्रीतम याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीच्या प्रवाहासोबत वाहून जाऊ लागला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी बापाने प्रयत्न केले. पण दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघांचाही मृत्यू झाला आहे. या घटनेचा माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. अंकुश लक्ष्मण साळुंखे (वय 35) आणि प्रीतम अंकुश साळुंखे (वय 12) असं मृत पावलेल्या बापलेकाची नावं आहेत. ते कोडोली चंदनगर परिसरातील रहिवासी आहे. घटनेच्या दिवशी मृत साळुंखे हे वाकळा धुण्यासाठी आपला 12 वर्षीय मुलगा प्रीतम याला घेऊन कृष्णाधाम याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांचासोबत धाकटा मुलगा आणि चुलत भाऊ देखील होते. मृत अंकुश आणि प्रीतम हे बापलेक कृष्णा नदीच्या घाटालगत पाण्यात उतरून वाकळा धुवत होते. हेही वाचा-साखरपुड्याच्या 3दिवस आधीच मृत्यूनं गाठलं; औरंगाबादेत होतकरू तरुणाचा दुर्दैवी अंत दरम्यान, वाकळा धुवत असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने प्रीतम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. यावेळी वडील अंकुश यांनी आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही पोहता येत नसल्याने दोघं बापलेक पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यावेळी घाटावर बसलेला धाकटा मुलगा आणि अंकुश यांचा चुलत भावानं मदतीसाठी आरडाओरडा केला. पण परिसरात कुणीच नसल्याने त्यांच्या मदतीला कुणीच आलं नाही. यानंतर अंकुश यांच्या चुलत भावाने फोन करून घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. हेही वाचा-माहेरहून परत येताच सासरी केला शेवट, लग्नानंतर 7 महिन्यातच विवाहितेचं टोकाचं पाऊल घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी नदीपात्रात सर्वत्र शोधाशोध केली. पण बापलेकाचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास बचाव टीमने अथक प्रयत्न करत अंकुश यांचा मृतदेह खोल पाण्यातून शोधून काढला आहे. अद्याप प्रीतमचा मृतदेह सापडला नसून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. बापलेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने कृष्णाधाम घाटावर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Satara

    पुढील बातम्या