मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भीषण अपघातात चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी आणि मेहुणा गंभीर

भीषण अपघातात चिमुकल्यासह वडिलांचा जागीच मृत्यू, मुलगी आणि मेहुणा गंभीर

लग्न सोहळा आटोपून आपल्या गावी जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळानं झडप घातली आणि दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

लग्न सोहळा आटोपून आपल्या गावी जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळानं झडप घातली आणि दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

लग्न सोहळा आटोपून आपल्या गावी जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळानं झडप घातली आणि दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.

नरेंद्र मते, (प्रतिनिधी)

वर्धा, 29 जून: लग्न सोहळा आटोपून आपल्या गावी जाणाऱ्या पिता-पुत्रावर काळानं झडप घातली आणि दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिली. यात चार वर्षीय चिमुकला आणि त्याचे वडील अक्षरश: चेंडूसारखे फेकले गेले. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले आहेत. हिंगणघाट येथे वना नदीच्या पुलावर सोमवारी हा भीषण अपघात झाला.

हेही वाचा...TikTok स्टारची गळा आवळून हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये अशा अवस्थेत सापडला मृतदेह

मिळालेली माहिती अशी की, हिंगणघाट येथील विवाह सोहळा आटोपून गणेश प्रभाकर कोसुरकर (वय-38), कार्तिक कोसुरकर (वय 5), सुहानी कोसुरकर (वय 10) आणि सचिन बाबाराव वरभे (वय 30, गणेश यांचा मेहुणा) हे मोटर सायकल (एम एच 32/6334) ने हे चौघे आजनसरा येथे आपल्या गावी निघाले होते. मात्र, वर्धा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर वना नदीच्या जुन्या पुलावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एम एच 31 डी एस 6627) त्यांना गणेश कोसुरकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, गणेश आणि कार्तिक याचा जागेवरच मृत्यु झाला. ट्रकचं चाक बाप-मुलाच्या डोक्यावरून गेलं. तर या अपघातात सचिन वरभे आणि सुहानी गंभीर जखमी झाली आहे. दोघांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुसरीकडे, ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे मार्गादर्शनाखाली हिंगणघाट पोलिस पुढील तपास करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा...मास्क वापरा अन्यथा भरा एवढा दंड!, प्रशासनानं जारी केला नवा आदेश

दरम्यान, वर्धा-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 वर वना नदीच्या जुन्या पुलावर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे. आतापर्यंत अनेक अपघात झाले आहेत.

First published:

Tags: Accident, Crime news, Wardha