क्षणात बाप-लेकराच्या आयुष्याला पुर्नविऱ्हाम, पोहायला शिकवणाऱ्या वडिलांसह मुलाचाही मृत्यू

क्षणात बाप-लेकराच्या आयुष्याला पुर्नविऱ्हाम, पोहायला शिकवणाऱ्या वडिलांसह मुलाचाही मृत्यू

इयत्ता सहावी मध्ये अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे इथे सोनू शिकत होता. हे दोघेही पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते.

  • Share this:

विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी

करमाळा, 09 नोव्हेंबर : एकाच वेळी वडिल आणि मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. करमाळा तालुक्यातील मलवडी येथील दुर्गुळे कोंढलकर वस्ती येथील विहिरीवर मुलाचा आणि वडिलांचा एकाच वेळी मृत्यू झाला आहे. मुलाला पोहायला शिकवताना वडिलांचा आणि पोहायला शिकणाऱ्या मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवाजी भीमराव कोंढलकर ( वय 35 वर्ष ) असं वडिलांचं तर सोनू शिवाजी कोंढलकर ( वय 11 वर्ष )असं मुलाचं नाव आहे. इयत्ता सहावी मध्ये अजितदादा पवार विद्यालय वडशिवणे इथे सोनू शिकत होता. हे दोघेही पोहण्यासाठी विहिरीत उतरले होते. वडिल शिवाजी हे सोनूला पोहायला शिकवण्यासाठी घेऊन गेले होते. पण सतत सुरू असलेल्या पावासामुळे विहिरीत पाण्याचं प्रमाण जास्त होतं. अशात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बाप-लेकाचाही मृत्यू झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

विहिरीत जास्त पाणी असल्याने  अद्याप दोघांचाही मृतदेह सापडले नसून मोटारीच्या साहाय्याने विहिरीतलं पाणी काढण्याचं काम सुरू आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासनाकडून मृतदेह शोधण्याचं काम सुरू आहे. अशा प्रकारे वडिल आणि मुलानेही प्राण गमावल्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. तर कोंढलकर कुटुंबीयांवरही दुखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, बीडमध्ये बाप-लेकाचा मृत्यू झाल्याचा एक गंभीर प्रकार समोर आला आहे. स्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणाचे आणखी दोन बळी गेले आहेत. केज तालुक्यातील बरड फाटा येथे एसटी बस आणि रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात बापलेकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना काल (शुक्रवार) रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली.

मिळालेली माहिती अशी की, केज-मांजरसूंबा-पाटोदा रस्त्याचे काम सुरु आहे. काम करताऱ्या एचपीएम (HPM)कंपनी च्या निष्काळजीपणाचे आणखी दोन बळी गेले आहेत. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. वळण रस्ता आणि दिशादर्शक फलक नसल्यामुळे या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरु असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

विक्रम आणवने (वय- 55), दत्ता विक्रम आणवने (वय-15, दोघे.रा.चाकरवाडी ता.बीड) अशी अपघातातील मृत बाप-लेकांची नावे आहेत. चाकरवाडीकडे परतत असताना त्यांच्या रिक्षाला बरड फाट्यापासून बोरीच्या बागाजवळ औरंगाबाद-लातुर बसने जोराची धडक दिली. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. या अपघातात भूषण लहाने, गोविंद मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रस्त्याचे करणाऱ्या कंपनीने अनेक पुलाचे अर्धवट काम केले. तर दोन्ही बाजूने रस्ता खोदून ठेवला आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 9, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading