1 जूनपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांचं शिक्कामोर्तब

1 जूनपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांचं शिक्कामोर्तब

पुणतांब्यात राज्यव्यापी शेतकरी बैठकीत हा निर्णय झालाय. राज्यातील विविध जिल्हयातून आलेल्या शेतकऱ्यांचा या बैठकीत सहभाग होता.

  • Share this:

22 मे : एक जूनपासून संपावर जाण्याच्या निर्णयावर शेतकऱ्यांनी शिक्कामोर्तब केलंय. पुणतांब्यात राज्यव्यापी शेतकरी बैठकीत हा निर्णय झालाय. राज्यातील विविध जिल्हयातून आलेल्या शेतकऱ्यांचा या बैठकीत सहभाग होता.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, शेतकर्‍यांना पेन्शन योजना लागू करावी, यासह अनेक मागण्यांवर शेतकरी ठाम आहेत.

एक जूनपासून शेतकरी कोणताही उत्पादित केलेला शेतीमाल,दूध विकणार नाही. शहराकडे जाणारे दूध आणि भाजीपालाही रोखणार असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं.

First published: May 22, 2017, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading