फक्त 4 टक्क्यांनी पीककर्ज उपलब्ध, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

फक्त 4 टक्क्यांनी पीककर्ज उपलब्ध, केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

सद्द्यस्थितीत शेतकऱ्यांना 9 टक्के दरानं कर्ज दिलं जातं. त्यात पाच टक्के वाटा केंद्र सरकार उचलणार आहेत.

  • Share this:

14 जून : शेतकऱ्यांनी कमी दरात पीककर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानेही मंजुरी दिलीय. सद्द्यस्थितीत शेतकऱ्यांना 9 टक्के दरानं कर्ज दिलं जातं. त्यात पाच टक्के वाटा केंद्र सरकार उचलणार आहेत. म्हणजे 2 टक्के सबसिडी आणि वेळेवर कर्ज भरलं तर 3 टक्के असं पाच टक्के रक्कम सरकार भरेल.

पीककर्जात मुद्दल रक्कमेपेक्षा व्याजाचं ओझं जास्त झाली की कर्जाची रक्कम वाढते. त्यावर उपाय म्हणून एका वर्षासाठी घेतलेलं कर्ज कमी दरात देण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 19 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

केंद्राची योजना नेमकी काय आहे?

इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम अशी कमी दरात

पीककर्ज देणारी केंद्राची मंजुरी

कर्जावरील 5 टक्के रक्कम सरकार देणार

शेतकऱ्यांना 9 टक्के व्याजाने मिळणारं

कर्ज 4 टक्के दराने मिळणार

एका वर्षासाठी कर्ज घेतलेल्या

शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

जास्तीत जास्त 3 लाख रुपये कर्ज

घेणाऱ्या शेतकऱ्यांना योजना लागू

सरकारच्या तिजोरीवर 19 हजार

कोटी रुपयांचा बोजा पडणार

First published: June 14, 2017, 7:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading