Home /News /maharashtra /

राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त

राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त

पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार (minister abdul sattar) आज आले होते. मात्र, त्यांनी वर-वर काही मिनिटांची पाहणी केली आणि निघून गेल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

  जळगाव, 01 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि महापूर यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार (minister abdul sattar) आज आले होते. मात्र, त्यांनी वर-वर काही मिनिटांची पाहणी केली आणि निघून गेल्यानं शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच मुख्यमंत्री मदत जाहीर करतील, असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिलं. चाळीसगाव (abdul sattar in jalgaon) शहरासह अनेक गाव पुराने वेढले गेले होते. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, याची पाहणी करण्यासाठी राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार चाळीसगाव तालुक्‍यात आले. मात्र त्‍यांनी काही वेळ थांबत वरच्‍यावर पाहणी करून लागलीच परतले. त्‍यांनी नुकसानग्रस्‍त शेतकऱ्याशी देखील संवाद न साधताच निघून गेल्‍याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे शेतकरी व नागरिकांनी याबाबत रोष व्‍यक्‍त केला आहे. अतिवृष्टी आणि महापुरामुळं जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच, नेमके किती नुकसान झाले, याची आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मुख्यमंत्री मदतीची घोषणा करतील, असे स्पष्ट करत नुकसानग्रस्तांना मदत करण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी सांगितले. हे वाचा - बापरे.. क्षणार्धात कोसळली भिंत, तीन तरुण थोडक्यात वाचले; थरारक Video व्हायरल चाळीसगाव तालुका व परिसरात ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाल्‍याने शेतातील पिकांसह घरं, दुकानांचे मोठे नुकसान झाले. तसेच काहींचे गुरे देखील पुरात वाहून गेली आहे. या सर्व नुकसानग्रस्‍त भागाची पाहणी करण्यासाठी अब्‍दुल सत्‍तार औरंगाबादनंतर चाळीसगाव तालुक्‍यात आले होते. त्‍यांनी सर्व नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत नुकसानीची भरपाई देण्याचे आश्‍वासन दिले.

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Jalgaon

  पुढील बातम्या