संदीप राजगोळकर (प्रतिनिधी)कोल्हापूर, 18 नोव्हेंबर: आधी महापूर नंतर अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे बदलणाऱ्या हवामानचा फटका पिकाला बसला. पावसानं पीक वाहून गेली आणि उसलेलं पीक अवकाळी पावसानंतर आलेल्या किडे आणि अळ्यांनी उद्ध्वस्त केलं. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांने प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी केली. मात्र पीकविमा नाही आणि मदतही न मिळाल्यानं शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. कोल्हापूर आणि इगतपुरीमधील शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि पिकाचं झालेलं नुकसान याचा तणाव आल्यानं आयुष्य संपवलं.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंवाड इथे 64 वर्षीय शेतकऱ्याने गोठ्यातील तुळीला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तुकाराम माने असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. पहाटे देव दर्शन केल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे इगतपुरी तालुक्यातील कावनई इथे जयवंत शिरसाट या शेतकऱ्यानं पिकाचं झालेलं नुकसान पाहून डोक्याला हात लावला. पिकासाठी काढलेलं कर्ज परत फेडता येणार नाही या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा