सरकारकडून आंदोलकांची मुस्कटदाबी ?, नाशिक, कोल्हापूरपाठोपाठ पुण्यातही जमावबंदी

सरकारकडून आंदोलकांची मुस्कटदाबी ?, नाशिक, कोल्हापूरपाठोपाठ पुण्यातही जमावबंदी

नाशिक, कोल्हापूर पाठोपाठ आता पुण्यातही जमावबंदी लागू करण्यात आलीये.

  • Share this:

06 जून : शेतकरी संप सहाव्या दिवशी सुरूच असल्यामुळे आता सरकारने मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केलीये. नाशिक, कोल्हापूर पाठोपाठ आता पुण्यातही जमावबंदी लागू करण्यात आलीये.

शेतकरी संपात फूट पडल्यानंतरही शेतकरी मागे हटण्यास तयार नाही. सहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचा संप सुरूच आहे. आता शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने हाती घेतलाय. नाशिक, कोल्हापूरनंतर पुण्यातही आता जमावबंदी लागू करण्यात आलीये.

पुणे शहराचे पोलीस सह-आयुक्त रवींद्र कदम यांनी त्यांना प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिनांक 16 जून रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1)(3)अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.त्यामुळे आंदोलन चिरडण्यासाठी जमावबंदी लावलीये का ? की सरकार शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करतंय का? असा प्रश्न आता निर्माण झालाय.

First published: June 6, 2017, 7:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading