शेतकरी आंदोलनाची पुन्हा घोषणा, १४ आणि १५ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम

शेतकरी आंदोलनाची पुन्हा घोषणा, १४ आणि १५ ऑगस्टला राज्यभर चक्काजाम

प्रत्येक जिल्ह्यात 15 आॅगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशाराही सुकाणू समितीने दिला.

  • Share this:

12 आॅगस्ट : शेतकरी संघटनांच्या आंदोलनानंतर आता सुकाणू समितीने 14 आणि 15 ऑगस्टला पुन्हा नव्याने राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. तसंच प्रत्येक जिल्ह्यात 15 आॅगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असा इशाराही समितीने दिला.

जून महिन्यात शेतकऱ्यांच्या उग्र आंदोलनानंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली. मात्र, कर्जमाफीची अंमलबाजवणी हवी तशी होऊ शकली नाही. अजूनही शेतकऱ्यांकडून आॅनलाईन अर्ज भरून घेणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनात स्थापन झालेल्या सुकाणू समितीने पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.  १४ आणि १५ ऑगस्टला राज्यभर चक्का जाम आंदोलनाची कॉम्रेड अजित नवले यांनी घोषणा केलीये. मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेला अजित नवले. आमदार बच्चू कडू, रघुनाथदादा पाटील उपस्थित होते.

या आंदोलनाच्या माध्यमातून गावागावात मोठं आंदोलन केलं जाईल. या आंदोलनात सुकाणू समितीची स्थापन झालेली विद्यार्थी संघटनाही सहभागी असेल. 15 ऑगस्टला शेतकरी ध्वजारोहण करतील पण प्रत्येक जिल्ह्यांमधील पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही अशी भूमिकाही सुकाणू समितीने घेतली आहे.

जोपर्यंत सरसकट कर्जमाफी, पिकाला योग्य हमीभाव, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरू राहील असा इशारा सुकाणू समितीने दिला आहे.

 

आंदोलनावर ठाम -रघुनाथदादा पाटील

                     

आम्ही वाट पहिली पण काही झालं नाही. आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करू. पण तीन वर्ष झालं तरी काहीच झालं नाही. शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत असा इशारा रघुनाथ पाटील यांनी दिला.

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका -बच्चू कडू

मुख्यमंत्र्यांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर जे होईल त्याला सरकार जबाबदार राहील. अजूनही वेळ गेलेली नाही असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.  विद्यार्थ्यांचे आॅनलाईन पेपर तुम्ही तपासू शकले नाहीत आता काय शेतकऱ्यांना फाॅर्म भरायला लावत आहात असा टोलाही कडूंनी लगावला.

First published: August 12, 2017, 6:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading