अठरा गावांच्या पाणी योजनेसाठी ग्रामस्थांचं 'शोले स्टाईल' आंदोलन

अठरा गावांच्या पाणी योजनेसाठी ग्रामस्थांचं 'शोले स्टाईल' आंदोलन

अठरा गावच्या सरपंचासह सुमारे पाचशे ग्रामस्थ नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या ऑफिस समोर उपोषणाला बसले आहेत.

  • Share this:

अहमदनगर, 23 जुलै : - नेवासे तालुक्यातील सोनई करजगावसह अठरा गावाची पाणी योजना तातडीने सुरू करावी व ती योजना सुरु होईपर्यंत या सर्व गावात पाण्याचे टँकर चालू करावी यासाठी ग्रामस्थांनी आज शोले स्टाईल आंदोलन केलं. आंदोलनाचा भाग म्हणून उपोषणही सुरू करण्यात आलं आहे. त्याच दरम्यान काही आक्रमक आंदोलक थेट प्राधिकरणाच्या इमारतीवर जाऊन चढले आणि घोषणाबाजीही केली.

या आंदोलकांच्या इतरही काही मागण्या आहेत. कामे पूर्ण झाली नसतांना ठेकेदाराला दिलेल्या बिलाची चौकशी करावी, योजनेचे काम पूर्ण करून 1 वर्ष योजना प्राधिकरणाने चालवावी या मागणीसाठी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली योजनेचे लाभार्थी  आणि अठरा गावच्या सरपंचासह सुमारे पाचशे ग्रामस्थ नगर येथील जीवन प्राधिकरणाच्या ऑफिस समोर उपोषणाला बसले आहेत.

तर याच वेळी काही आंदोलक आक्रमक होत प्राधिकरणाच्या इमारतीवर चढले आणि घोषणाबाजी केली. या आक्रमक पावित्र्यामुळे वातावरण तणावपूर्ण झालं होतं. नंतर आंदोलकांनी ताळ मृदुंगासह भजन गात परिसर दणाणून सोडला. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवाशाचे विद्यमान भाजप आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना यासाछी जबाबदार धरत राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी दिल्याने नेवासे तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला.

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध होणार

आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्याची यादी पंधरा दिवसांत जाहीर करा, अन्यथा गाठ शिवसेनेशी आहे...! असा इशारा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे सहकार विभाग आता कामाला लागलंय.  राज्यातील ज्या शेतकर्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी झाली. आणि कोणाला नाकारली, त्याची संपूर्ण यादी दोन दिवसांत सहकार विभागाच्या तालुकास्तरावरील सहाय्यक उपनिबंधक कार्यालयात लावण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतलाय. त्यामुळे कोणाला कर्जमाफी झाली, कोणाला का नाकारली याची सर्व माहितीच सर्वसामान्य शेतकर्यांना उपलब्ध होणार आहे.

बारामतीत देशी दारूच्या दुकानाबाहेर दारुड्यांची तुफान हाणामारी, VIDEO व्हायरल

शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने तब्बल 45 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी योजना जाहीर केली होती. त्यानुसार लाखो शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज केले होते. मात्र काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर काहीजण कर्जमाफीसाठी अपात्र ठरले. त्यामुळे शेतकरीवर्गामध्ये मोठी नाराजी पसरली होती.

येत्या 48 तासांत मुंबईसह या भागांत पडणार मुसळधार पाऊस

तसेच आपल्याला का कर्जमाफी झाली नाही...? यावरूनही त्यांच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती होती. त्याची गंभीर दखल घेऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा नाकारणाऱ्या विमा कंपन्यांविरोधात बीकेसीमध्ये काढलेल्या मोर्चादरम्यान, सर्वसामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफीची माहिती व्हावी म्हणून त्याची यादी जाहीर करण्याचे आवाहन केले होते.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 23, 2019, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading