ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन; ट्रॅक्टरची हवा सोडून निषेध

ऊस दरवाढीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन; ट्रॅक्टरची हवा सोडून निषेध

काल रात्री भिगवण बारामती रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून निषेध नोंदविला. ऊसाला पहिला हप्ता 3500 रुपये मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने या आंदोलनाची सुरुवात केली आहे.

  • Share this:

 इंदापूर ,03 नोव्हेंबर: शेतकरी संघटनेच्या ऊस दरवाढीच्या आंदोलनाची पहिली ठिणगी इंदापूर तालुक्यात पडलीय. काल इंदापूरातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं.

काल रात्री भिगवण बारामती रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडून निषेध नोंदविला. ऊसाला पहिला हप्ता 3500 रुपये मिळावा यासाठी शेतकरी संघटनेने या आंदोलनाची सुरुवात केली आहे. ऊसाला पहिला हप्ता 3500 रुपये ठरल्या शिवाय ऊस वाहतूकदारांनी ऊसाची वाहतूक करु नये असे अवाहन शेतकरी संघटना करत आहे.

तर दुसरीकडे ऊस दराबाबतची मुंबईतली बैठक निष्फळ ठरलीये. शेतकरी संघटना आणि सहकारमंत्र्यांमध्ये बैठक होती. 3 हजार 500 भाव दिल्याशिवाय कारखाने चालू देणार नाही, असा इशारा रघुनाथदादा पाटील यांनी दिला होता. महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यांमध्ये ऊसाला जास्त भाव आहे असं रघुनाथदादांचं म्हणणं आहे. शेतकरी संघटना भूमिकेवर ठाम असल्याने पुन्हा बैठक होणार आहे.

या बैठकीत राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोतांमध्ये फूट पडल्यापासून दोघं पहिल्यांदाच समोरासमोर आले. मुंबईत . शासकीय विश्रामगृह सह्याद्रीवरही बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी आणि रघुनाथदादा पाटील बैठकीला उपस्थित होते.

First published: November 3, 2017, 9:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading