अहमदनगर, 17 जून : दूध दरवाढीच्या (milk rate) मुद्यावरून पुन्हा एकदा शेतकरी (Farmers Protest) रस्त्यावर उतरले आहे. राज्यभरात ठिकठिकाणी किसान सभेच्या वतीने आंदोलनाला सुरुवात झाली आहे. अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
आज किसान सभा (Kisan sabha) आणि संघर्ष समितीतर्फे (Akhil Bharatiya Kisan Sabha) दूध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी संपूर्ण राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलनाला सुरूवात झाली आहे. किसान सभेचे नेते अजित नवले यांच्या उपस्थितीत अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरूवात करण्यात आली आहे. लॅाकडाऊन पूर्वी दूधाला 35 रूपये दर मिळत होता तो 20 रूपये करण्यात आला आहे. तो पुन्हा 35 रूपये करण्यात यावा, अशी मागणी संघटनेनं केली आहे.
किसान सभेच्या दूध आंदोलनाला सुरुवात, अकोले तालुक्यातील अंबड गावातील अकोले येथे दूधाचा अभिषेक करत आंदोलनाला सुरुवात pic.twitter.com/BR1m3FXtw9
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी व सहकारी दूध संघाकडून मोठी लूटमार करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर दहा ते पंधरा रुपये प्रति लिटरने पाडले असून ग्राहकांसाठीचे विक्रीदर मात्र तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे, असा आरोप या संघटनेनं केला आहे.
काय आहे मागण्या1. लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा. लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरू करा.2. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा.3. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा.4. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा.5. दूध भेसळी बंद करा. टोंन्ड दुधावर बंदी आणा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.