मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Satara, Sangli Farmers : सातारा, सांगलीच्या शेतकऱ्यांना हळद व्यापाऱ्याने तब्बल 2 कोटींना गंडवले, स्वाभिमानी आक्रमक

Satara, Sangli Farmers : सातारा, सांगलीच्या शेतकऱ्यांना हळद व्यापाऱ्याने तब्बल 2 कोटींना गंडवले, स्वाभिमानी आक्रमक

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांगलीतील एका व्यापाऱ्यांने तब्बल 2 कोटींची हळद खरेदी करून शेतकऱ्यांना गंडा घातला आहे.

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांगलीतील एका व्यापाऱ्यांने तब्बल 2 कोटींची हळद खरेदी करून शेतकऱ्यांना गंडा घातला आहे.

हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांगलीतील एका व्यापाऱ्यांने तब्बल 2 कोटींची हळद खरेदी करून शेतकऱ्यांना गंडा घातला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sangli Miraj Kupwad, India

सांगली, 23 जुलै : सांगली जिल्हा हळद व्यापार करणार जिल्हा म्हणून ओळखला जातो. सांगली जिल्ह्यात हळदीचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असल्याने तेथील व्यापार पेठ मोठी आहे. दरम्यान राज्यातील अनेक व्यापारी येथील शेतकऱ्यांची हळद विकत घेतात. परंतु ही हळद व्यापारी घेतात पण शेतकऱ्यांना पैसे देताना त्यांचे हात आकसताना दिसत आहेत. सांगली जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. सांगलीतील एका व्यापाऱ्यांने तब्बल 2 कोटींची हळद खरेदी करून शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. (Satara, Sangli Farmers)

सांगलीच्या वखारभाग येथील हळद व्यापारी राजकुमार सारडा यांनी शेतकऱ्यांना फसवल्याची तक्रार आहे. या रकमेच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शुक्रवारी सारडा यांच्या घरावर मोर्चा काढला. त्याच्या घरासमोर शंखध्वनी केला. महिन्याभरात पैसे न दिल्यास घरात घुसणार, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. दरम्यान सारडा यांनी मागच्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांना फसवण्याचा फंडा चालू केला असल्याचे महेश खराडे यांनी सांगितले.

हे ही वाचा : 'नारायण राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिलेली आणि आता एकनाथ शिंदे..' नितेश राणेंचा गंभीर आरोप

सांगली शहरातील पटेल चौकातून सारडा यांच्या बंगल्यापर्यंत मोर्चा नेण्यात आला. आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सारडा यांचा निषेध केला. यावेळी खराडे म्हणाले, सारडा यांनी चार वर्षापूर्वी वाई, कोरेगावसह सातारा जिल्ह्यातील 200 शेतकऱ्यांची हळद खरेदी केली होती. सर्व शेतकऱ्यांची सुमारे दोन कोटी रुपये रक्कम आहे.

गेल्या चार वर्षात एक रुपयाही सारडा यांनी शेतकऱ्यांना दिलेला नाही. दिलेले चेकही वटले नाहीत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार मागणी करूनही सारडा यांनी टाळाटाळ चालविली आहे.

हे ही वाचा : shiv sena saamana Editorial : शिवसेनेकडून भाजपचे ‘या’ कारणासाठी कौतुक, भाजपच्या शिडीवर ठेवलेले हे पहिले पाऊलच…

यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. सारडा यांनी तत्काळ पैसे द्यावेत, अन्यथा घरात ठिय्या मारू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Farmer protest, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news, Swabhimani Shetkari Sanghatana