राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी 'अ‍ॅक्शन'मध्ये, काँग्रेसला अल्टिमेटम

राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजू शेट्टी 'अ‍ॅक्शन'मध्ये, काँग्रेसला अल्टिमेटम

'सरकारविरोधातला रोष टिकवून ठेवण्यासाठी मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढले पाहिजे.'

  • Share this:

पंढरपूर 11 जुलै : विधान सभेच्या निवडणुका जवळ येत असतानाच आता राजकीय वातावरण तापायला सुरूवात झालीय. लोकसभेतल्या पराभवानंतर राजू शेटी यांनी सावध पावलं टाकायला सुरुवात केलीय. काही दिवसांपूर्वीच त्यांनी राज ठाकरेल यांची भेट घेऊन चर्चा केली होती. आता त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इशारा दिलाय. आघाडीबाबत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना एकला चलो रे ची भूमिका घेणार असल्याचं त्यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना स्पष्ट केलं.

वाखरी ते पंढरपूर असा पायी प्रवास करुन त्यांनी विठूरायाचं दर्शन घेतलं. सरकारविरोधातला रोष टिकवून ठेवण्यासाठी मनसे, वंचित आघाडीसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र लढले पाहिजे असं मतही माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आघाडीच्या जागावापाचं गुऱ्हाळ खूपच रखडलं होतं. त्यामुळे शेवटपर्यंत जागांचा घोळ झाला आणि त्याचा प्रचारावर प्रतिकूल परिणाम झाला.

अशोक चव्हाणांचा 'वंचित'वर आरोप

छगन भुजबळ 15 वर्षांनंतर बदलणार मतदारसंघ? 'या' तालुक्यातून लढण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढल्याने महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा फटका बसला. त्यामुळे काँग्रेसमधील काही नेत्यांनी वंचित ही भाजपचीच बी टीम असल्याचा आरोप केला. 'न्यूज 18 लोकमत'ने आता काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांना याबाबत प्रश्न विचारला.

वंचितच्या भूमिकेबाबत बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, 'मतांचं धृवीकरण होऊ नये असा आमचा प्रयत्न होता. त्यामुळेच वंचितला आघाडीत सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद आला नाही. प्रश्न A टीम किंवा B टीमचा नसून हा प्रकार वेगळाच आहे.'

'खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालणार '

'आम्ही चर्चेला तयार'

'विधानसभा निवडणुकीत वंचितने आघाडीत यावं, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत. विषय जागांचा नसून संविधान वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,' अशी भूमिका अशोक चव्हाण यांनी घेतली आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला विधानसभेसाठी जागांचा फॉर्म्युला दिला होता. 'विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आम्ही 40 जागा सोडत आहोत. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या 248 जागांवर निवडणूक लढवेल. त्यांना मंजूर असेल तर त्यांनी येत्या 10 दिवसांत उत्तर द्यावे,' अशी भूमिका वंचितने घेतली. वंचित आघाडीतर्फे अण्णाराव पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी ही भूमिका जाहीर केली होती.

First published: July 11, 2019, 5:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading