पीक कापणी प्रयोगातील चुंकाची भरपाई, या दोन तालुक्यांना मिळणार 56 कोटी

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दोन तालुक्यांना कृषी विभगाकडून ही नुकसानभरपाई मिळणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 09:26 PM IST

पीक कापणी प्रयोगातील चुंकाची भरपाई, या दोन तालुक्यांना मिळणार 56 कोटी

मुंबई 22 जुलै : उस्मानाबाद आणि लोहारा या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कापणी प्रयोगातील त्रुटींमुळे नुकसान सहन करावे लागले होते. यातल्या सोयाबीन उत्पादक विमा योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना  एकूण 56.61 कोटींची नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन विभागाने देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिले.

मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशमुख बोलत होते. ते म्हणाले, वित्त विभागाच्या सूचनेनुसार आणि औरंगाबाद खंडपीठाच्या सुनावणीनुसार दोन्ही तालुक्यातील महसूल मंडळ गटाचे उंबरठा उत्पन्न व महसूल मंडळाची प्रत्यक्ष उत्पादकता विचारात घेऊन सात महसूल मंडळातील ५८ हजार २३६ शेतकऱ्यांना ५३.६८ कोटी तर लोहारा तालुक्यातील एक महसूल मंडळातील ८ हजार ५३९ सहभागी शेतकऱ्यांना २.९३ कोटी असे एकूण ५६.६१ कोटी नुकसान भरपाई दिली जाणार आहे..

SPECIAL REPORT : BMC चा कोट्यवधीचा रोबोट आग न विझवताच आला परत!

त्याचबरोबर वर्धा जिल्ह्याच्या सरासरीच्या ४९ टक्केच पाऊस  झालेला आहे. हे पुरेसे नसून, महाकाली धरणाच्या मृत साठ्यामधून पाणी नागरिकांना देण्याचा निर्णयही घेण्यात आलाय. त्यासाठी अन्य जिल्ह्यातून पंप सेट उपलब्ध करणे, डिझेल जनरेटर भाड्याने घेण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. यासंदर्भातील अंदाजपत्रकाची आवश्यक छाननी करून प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार वर्धाचे जिल्हाधिकारी यांना देण्यात यावेत व तातडीने कामे पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही देशमुख यांनी यावेळी दिले.

दोघांना धडक देऊन समोरून येत होता मृत्यू, दुचाकीवरून उडी मारली म्हणून वाचला जीव!

Loading...

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे पैसे खात्यात जमा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान किसान सन्मान योजनेची घोषणा केली होती. त्यानुसार पावणे सहा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पण आणखी नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जमा होणं बाकी आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकले नाही. त्यांच्यासाठी सरकारने हेल्पलाईन तयार केलीय. ज्या शेतकऱ्यांना अडचण असेल ते या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करू शकतात.

आदित्य ठाकरेंच्या जन आशिर्वाद यात्रेचा साईदर्शनाने पहिला टप्पा पूर्ण

नवी दिल्लीत कृषी मंत्रालयात PM-KISAN Help Deskच्या pmkisan-ict@gov.in या ईमेलवर संपर्क करू शकतात किंवा Direct HelpLine 011-23381092 या नंबरवरही थेट फोन करू शकतात. इथे शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास संबंधीत विभागाकडे ती तक्रार सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 22, 2019 09:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...