समृद्धी हायवेविरोधात इगतपुरीच्या 20 गावातील 1900 शेतकरी जाणार हायकोर्टात

समृद्धी हायवेविरोधात इगतपुरीच्या 20 गावातील 1900 शेतकरी जाणार हायकोर्टात

आता इगतपुरी जिल्ह्यातील आणखी २० गावचे शेतकरी या महामार्गाला विरोध करत न्यायालयीन लढाई लढणार आहेत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, 14 जून : प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी हायवेला नाशिक जिल्ह्यातून वाढता विरोध होताना दिसतोय. या जिल्हातील शिवडे गावातील शेतकऱ्यांनी समृद्धी हायवेच्या भूसंपादनाला विरोध करत त्याविरोधात मुंबई हायकोर्टात नुकतीच रीट याचिका दाखल केली होती. आता इगतपुरी जिल्ह्यातील आणखी २० गावचे शेतकरी या महामार्गाला विरोध करत न्यायालयीन लढाई लढणार आहेत.

यात जवळपास १९०० शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. शिवडे गावातील शेतकऱ्यांच्यासोबतच इतर गावकऱ्यांच्या वतीनं आपण कोर्टात शेतकऱ्यांची बाजू मांडणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील रामेश्वर गीते यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई- आग्रा हायवे किंवा घोटी रस्त्याला समृद्धी हायवेत सामावून घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. समृद्धी हायवे हा मुख्यमंत्र्यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. हा वाद कोर्टात गेल्यास प्रकल्पावर त्याचा परिणाम होण्याची शक्य़ता आहे. आता मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची कशी समजूत काढतात का हे पाहावं लागेल.

इगतपुरी तालुक्यातील कोणकोणत्या गावांतून शेतकऱ्यांची याचिका दाखल झालीय?

पिंपळगाव डुकरा

भरवीर खुर्द

कवटधारा

धामणगा

गंभीरवाडी

बेलगाव तराडे

तातळवाडी

धामणी

पिंपळगाव मोर

उभाडे

देवळे

खैरगाव

शेनवड बुद्रुक

कांचनगाव

तळोघ

पिंपरी सदो

नांदगाव सदो

शेनीत

हांगोळ

तळोशी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2017 05:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading