Home /News /maharashtra /

बियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या,अमरावतीतील धक्कादायक घटना

बियाण उगवलं नाही म्हणून शेतकऱ्यांची आत्महत्या,अमरावतीतील धक्कादायक घटना

अनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून त्यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती.

अमरावती, 25 जून : राज्यभरात दूरपर्यंत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्याची खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामातील 60 टक्के पेरण्या आटोपल्या असल्या तरी काही ठिकाणी बियाणे उगविले नसल्यानं शेतकऱ्याचा अडचणीत  वाढ  झाली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील वसाड येथील अनिल गवई या शेतकऱ्यानं बियाणे न उगवल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील 1 हजार 400 लोकसंख्या असलेल्या वसाड गावात प्रत्येकाचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. अनिल गवई यांच्याकडे 4 एकर शेती आहे. यावर्षी कशीबशी खरीप हंगामाची तयारी करून अनिल यांनी सोयाबीन व कपाशीची पेरणी केली होती. मात्र, बियाणे न उगवल्याने ते विवंचनेत असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. अनिल गवई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. एकुलत्या एक मुलाच्या जाण्याने पूर्णपणे कोलमडून गेलेत सुशांतचे वडील एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं सांगत आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कोणतंच पाठबळ देत नाही. कर्जमाफीसुद्धा झाली नाही तर  नवीन कर्जपुरवठा करायला बँका तयार नाही. त्यामुळे शेतकरी आता सावकाराकडे जात आहे. या बोगस बियाणे विकणारा कंपन्यांसोबत कृषी अधिकाऱ्याचं साटंलोटं असताना त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचे मत आहे त्यामुळे बोगस बियाणे विकणे सोबत सोबतच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.  संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: Farmer, Farmer suicide, Seeds, शेतकरी आत्महत्या

पुढील बातम्या