भाजप-सेनेचा तिढा सुटेना, मला मुख्यमंत्री करा; शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र

भाजप-सेनेचा तिढा सुटेना, मला मुख्यमंत्री करा; शेतकऱ्याचे राज्यपालांना पत्र

राज्याला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला असून शेतकरी आणि सर्वसामान्य अडचणीत आले आहेत. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला मुख्यमंत्री करा अशी मागणी पत्रात केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : राज्यातील विधानसभा निवड़णुकीचे निकाल लागले पण अद्याप सत्तावाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीने बहुमत मिळवलं असलं तरी भाजप-सेनेच्या अद्याप चर्चाच सुरू आहेत. दरम्यान, एका शेतकऱ्याने या दोन पक्षांमधील मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटेपर्यंत मुख्यमंत्री पदाचा पदभार मिळावा असं पत्र राज्यपालांना लिहलं आहे.

सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत वाद सुरू असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या 'सिल्व्हर ओक' निवासस्थानी भेट घेतली. राज्यातील राजकीय घडामोडी होत असताना संजय राऊत यांच्या पवार भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.  कालानंतर राज्यात सत्तास्थापने संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. भाजपने विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केल्यानंतर शिवसेनेने विधिमंडळ गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड केली आहे.

विधिमंडळ गटनेत्यांची निवड झाली आता सत्ता स्थापनेसंदर्भात दोन्ही पक्षांचे नेते कधी चर्चा सुरु करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढच्या हालचालींकडेही राज्याचे लक्ष आहे. यातच शेतकऱ्याने मुख्यमंत्री पदाचा पदभार मिळावा असं पत्र राज्यपालांना लिहलं आहे.

बीड जिल्ह्यातील केज इथला रहिवाशी असलेल्या शेतकऱ्याने लिहलेल्या पत्रात म्हटलं की, मी गेल्या 10 ते 12 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारण करत आहे. शेतकरी आणि गोरगरिबांच्या प्रश्नांवर काम करत आहे. सध्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत अद्याप भाजप व शिवसेना यांचा मुख्यमंत्रीपदाचा तिढा निर्माण झाला आहे. राज्यातील शेतकरी वर्ग व सर्वसामान्य माणूस अडचणीत असून राज्याच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा असं म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला असताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेतली. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे सर्व नवनिर्वाचित आमदारांचा या शिष्टमंडळात समावेश होता. सत्तेतल्या वाटणीवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच आणि मान-अपमानाचे नाट्य सुरू आहे.

निकाल लागून सहा दिवस झालेत तरी अजून राज्यात सरकार स्थापनेसाठी कुणीही पुढाकार घेतलेला नाही. दोन्ही पक्षांमधले मतभेद दररोज वाढताना दिसत आहेत. ही सगळी पार्श्वभूमी असताना शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेणं राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलं आहे. ही भेट राज्यातल्या ओल्या दुष्काळाविषयी असल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जातंय मात्र या भेटीला राजकीय किनार असून हा दबावाचा भाग असल्याचीही चर्चा आहे.

वाचा : राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप, हेरगिरीसाठी मोदी सरकार घेतेय इस्रायलची मदत!

VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2019 08:44 AM IST

ताज्या बातम्या