अखेरच्या क्षणाला घोड्यावर रपेट करत थेट मतदान केंद्रावर पोहोचला शेतकरी

अखेरच्या क्षणाला घोड्यावर रपेट करत थेट मतदान केंद्रावर पोहोचला शेतकरी

मतदानाची वेळ संपत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतातून तातडीने पोहोचणे शक्य नसल्याने ते घोड्यावर रपेट करत थेट मतदान केंद्रावर पोहोचले.

  • Share this:

लातूर, 18 एप्रिल- जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बेलकुंड गावच्या विष्णू निवृत्ती कोळी या तरुण शेतकऱ्याने अखेरच्या क्षणी मतदानाचा हक्क बजावला. विष्णू निवृत्ती कोळी हे घोड्यावर रपेट करत थेट मतदान केंद्रावर पोहोचले.

विष्णू कोळी शेतीच्या कामात व्यस्त होते. मतदानाची वेळ संपत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेतातून तातडीने पोहोचणे शक्य नसल्याने ते घोड्यावर रपेट करत थेट मतदान केंद्रावर पोहोचले.

काय म्हणाले विष्णू कोळी?

मतदानाचे राष्ट्रीय कार्यात योगदान दिले याचा मोठा आनंद झाल्याचे विष्णू कोळी यांनी सांगितले. मतदान केंद्रावर घोडा दाखल झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्यात 10 जागांवर दुपारी पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान 

अकोला - 54.45 टक्के

अमरावती 55.43 टक्के

बुलडाणा- 57 .8 टक्के

हिंगोली - 60.69 टक्के

नांदेड - 60.88 टक्के

परभणी - 58.50 टक्के

उस्मानाबाद - 57.04 टक्के

सोलापूर - 51.98 टक्के

लातूर 57.94 टक्के

बीड - 58.44 टक्के

VIDEO: कोणतही चिन्हं दाबलं तरी मत कमळालाच जातं: प्रकाश आंबेडकर

First published: April 18, 2019, 8:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading