महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याचं मोदींनी केलं होतं कौतुक पण आता केला आत्महत्येचा प्रयत्न

रस्ता रुंदीकरण प्रकल्पात नुकसान भरपाई मिळायला उशीर झाला म्हणून अकोल्यामध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण या पाच शेतकऱ्यांपैकी एकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 'मन की बात' या कार्यक्रमात कौतुक केलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 06:03 PM IST

महाराष्ट्राच्या या शेतकऱ्याचं मोदींनी केलं होतं कौतुक पण आता केला आत्महत्येचा प्रयत्न

अकोला, 8 ऑगस्ट : रस्ता रुंदीकरण प्रकल्पात नुकसान भरपाई मिळायला उशीर झाला म्हणून अकोल्यामध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. अकोल्यात सोमवारी ही घटना घडली. पण या पाच शेतकऱ्यांपैकी एकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच 'मन की बात' या कार्यक्रमात कौतुक केलं होतं. मुरलीधर राऊत असं या 42 वर्षाच्या शेतकऱ्याचं नाव आहे. नोटबंदीनंतरच्या काळात त्यांनी गरिबांना मदत केली होती. ज्या गरीब लोकांकडे खाण्यासाठीही पैसे नव्हते अशा लोकांना मुरलीधर राऊत खायला घालत होते. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीन वर्षांपूर्वी त्यांचं कौतुक केलं होतं.

'आधी जेवा, मग बिल भरा'

अकोल्यामधळ्या बाळापूर तालुक्यात शेलाड गावामध्ये मुरलीधर राऊत यांचं हॉटेल होतं. ज्या लोकांकडे जुन्या नोटा असायच्या ते हॉटेलचं बिल भरू शकत नव्हते. अशा लोकांना मुरलीधर राऊत यांनी दिलासा दिला. आता हॉटेलमध्ये खाऊन मग कधीतरी उशिरानं हॉटेलचं बिल भरा, असं मुरलीधर राऊत यांनी सांगितलं. नोटबंदीनंतरच्या चणचणीच्या काळात त्यांनी दाखवलेल्या या माणुसकीची दखल पंतप्रधानांनी घेतली.

काँग्रेसच्या या नेत्याला एअरपोर्टवरच अडवलं, काश्मीरमध्ये जायला मज्जाव

शेलाड गावात जिथे मुरलीधर राऊत यांचं हॉटेल होतं ती जागा रस्ता रुंदीकरणासाठी घेतली गेली. याची नुकसान भरपाई मिळाली नाही म्हणून मुरलीधर राऊत यांनी आणखी 4 शेतकऱ्यांसह विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अकोल्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ही घटना घडली. या पाचही शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत. आता त्यांची तब्येत स्थिर आहे.

Loading...

5 शेतकऱ्यांवर उपचार

धुळे कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग बाळापूरमधून जातो. या महामार्गासाठी मुरलीधर राऊत, मदन हिवरकार, साजिद इक्बाल शेख मोहम्मद, मोहम्मद अफजल गुलाम नबी, अर्चना टकले यांची जमीन घेण्यात आली पण अपेक्षेप्रमाणे आणि वेळेत ही नुकसान भरपाई मिळाली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.

=================================================================================================

भीषण पूरस्थिती : एका बोटीसाठी जीवघेणी चढाओढ; VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 06:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...