पिकं करपली, बँक कर्ज देईना; हताश शेतकऱ्याचं शेतातच उपोषण सुरू

पिकं करपली, बँक कर्ज देईना; हताश शेतकऱ्याचं शेतातच उपोषण सुरू

घरी वडील मानसिक रुग्ण आहेत तर भाऊ अपंग आहे एवढं होऊन ही या शेतकऱ्याने हतबल न होता बँकेकडे पीक कर्जाची मागणी केली पण...

  • Share this:

पंकज क्षीरसागर,16 आॅक्टोबर : अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन गेले शिवाय बँक ही पीक कर्ज देईना वारंवार हेलपाटे मारून कंटाळलेल्या परभणीच्या जांब येथील शेतकऱ्याने चक्क आपल्या शेतातच पीक कर्ज मिळावं यासाठी उपोषण सुरू केलंय.

परभणी तालुक्यातील जांब येथील शेतकरी दत्ता रेंगे या शेतकऱ्याला ७ एकर शेती आहे ज्यात ५ एकर सोयाबीन लावले होते तर २ एकर कापूस आहे. यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने सोयाबीनचे उतपादन अत्यल्प झाले तर कापूस जागेवरच करपून गेलाय.

घरी वडील मानसिक रुग्ण आहेत तर भाऊ अपंग आहे एवढं होऊन ही या शेतकऱ्याने हतबल न होता बँकेकडे पीक कर्जाची मागणी केली. परंतु बँकेनं पीक कर्ज दिले नाही याबाबत अनेक वेळा तक्रारी करून ही कुणीच याची दखल घेतली नाही.

त्यामुळे हताश झालेल्या दत्ता रेंगे यांनी आपल्याशेतातच उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून शेतातील परिस्थिती प्रशासन आणि बँकेच्या लक्षात यावी म्हणून त्याने शेतात उपोषण सुरू केले असल्याचं सांगितलंय.

गावातील अनेक जण त्याच्या या उपोषणस्थळी येऊन भेटून जात आहेत. मात्र मला जोपर्यंत कर्ज मिळणार नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नसून माझे काही बरे वाईट झाल्यास प्रशासनच जबाबदार असल्याचं त्याने यावेळी सांगितलं.

================================

First published: October 16, 2018, 5:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading