नागपूर, 05 मे : विदर्भातील वर्धा जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याच्या आत्महत्येला २४ तास लोटत नाही, तोच नागपुरात आणखी एका शेतकऱ्यानं आत्महत्या केलीये.
मौदा तालुक्यातील पिपरी गावातील शंकर हरीभाऊ किरपाने या तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केलीय. शंकर यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यासोबतच कुटुंबाला हातभार लावता यावा म्हणून त्यांनी कृषी सेवा केंद्र सुरू केलं होतं.
पण नापिकी आणि शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्यानं शेतीवर कर्जाचा डोंगर वाढत गेला. इतर शेतकऱ्यांचीही हिच स्थिती आहे, त्यामुळे शंकर किरपाने यांच्या कृषी सेवा केंद्रातील उधारीही वसूल झाली नाही, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शंकर यांनी काल शेतात झाडाला गळफास लावून आत्महत्या केलीय.