नवी दिल्ली, 01 डिसेंबर: दुष्काळ, ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा, रोजगार, कुटुंबातील सदस्यांचं आजारपण, मुलीचं लग्न अशा विविध कारणातून देशात दरवर्षी हजारे शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide in India) करत आहेत. प्रशासनाचा नाकर्तेपणा हा शेतकऱ्याच्या आत्महत्येमागील सर्वात मोठं कारण आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 2020 मध्ये देशात एकूण 5579 शेतकऱ्यांनी विविध कारणातून मृत्यूला कवटाळलं आहे, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर (Union Agriculture Minister Narendra Tomar) यांनी मंगळवारी संसदेत दिली. 2019 च्या तुलनेत शेतकऱ्यांच्या आत्महत्येत घट झाली असली तरी हा आकडा लहान नाही.
2019 मध्ये देशात 5957 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (NCRB) आकडेवारीचा हवाला देत तोमर यांनी सांगितलं की, शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यामागचे वेगळे कारण एनसीआरबीने अहवालात दिलं नाही. पण कौटुंबीक समस्या, आजारपण, अमली पदार्थांचा गैरवापर, व्यसन, प्रेम प्रकरणं, विवाहसंबधित मुद्दे, बेरोजगारी, व्यावसायिक समस्या, परीक्षेतील अपयश, संपत्तीचा वाद अशा विविध कारणातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
हेही वाचा-..अन् पठ्ठ्याने थेट पत्नीच्या किडनीचाच केला सौदा; पतीचा प्रताप वाचून व्हाल हैराण
सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात
महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग शेतकऱ्यांसाठी 'सुसाईड झोन' म्हणूनच ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षात या भागातील अनेक शेतकरी कुटुंबीयांची संसारं उद्धवस्त झाली आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून मराठवाड्यात दुष्काळ आणि ओला दुष्काळाचा जबरदस्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे या विभागातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.
हेही वाचा-आरोग्य अधिकाऱ्याकडून सहकारी महिलेचा लैंगिक छळ; जबरदस्ती फिरायला घेऊन गेला अन्...
2020 मध्ये महाराष्ट्रात एकूण 2567 शेतकऱ्यांनी आत्महत्या (Farmer Suicide in Maharashtra) केल्या आहेत. हा आकडा देशातील एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या तुलनेत तब्बल 43 इतका आहे. म्हणजेच देशातील आत्महत्या करणारे जवळपास आर्धे शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यापाठोपाठ, कर्नाटक (1072), आंध्र प्रदेश (564), तेलंगणा (466), मध्य प्रदेश (235), आणि चंदीगडमध्ये 227 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर उत्तर प्रदेशात 2020 मध्ये 87 शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा शेवट केला आहे. त्यानंतर, तामिळनाडू (79), केरळ (57), आसाम (12), हिमाचल प्रदेशमध्ये 6 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या व्यतिरिक्त मेघालय आणि मिझोराम या ईशान्यकडील राज्यात प्रत्येक चार शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Farmer, India, Suicide, महाराष्ट्र