साक्षीदार म्हणून गेला आणि शेतीच गमावली, 72 वर्षाच्या शेतकऱ्याची आत्महत्या

साक्षीदार म्हणून गेला आणि शेतीच गमावली, 72 वर्षाच्या शेतकऱ्याची आत्महत्या

प्रदीप हिवरे आणि वर्षा हिवरे यांनी संगणमत करत शेंडे यांची जमीन हडपली. हिवरे यांनी जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली.

  • Share this:

नरेंद्र मते, प्रतिनिधी,

वर्धा, 07 जुलै : कर्जामुळे, गरिबीमुळे, शेतीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार वर्धामध्ये घडला आहे. शेतीच्या वादातून शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. एका व्यक्तीबरोबर शेतीमुळे वाद सुरू होता. त्यात हाती निराशा पडत असल्यामुळे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली आहे.

मांडवा नजीकच्या टेंभरी शेत शिवारात ही घटना घडली आहे. कृष्णाजी लक्ष्मण शेंडे (वय 72) असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. प्रदीप हिवरे आणि वर्षा हिवरे यांनी संगणमत करत शेंडे यांची जमीन हडपली. हिवरे यांनी जमीन स्वत:च्या नावावर करून घेतली. या सगळ्यामध्ये प्रदीप रामटेके या दलालाचाही हात असल्याचा आरोप शेंडे यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

हिवरे यांनी प्लॉटच्या खरेदीत साक्षिदार म्हणून नेतो असं सांगत शेताची खरेदी केली. बनावी कागदपत्रांवर त्यांच्या सह्या करत जमीन स्वत:च्या नावावर केली. सगळ्या घटनेची माहिती मिळताच कृष्णा शेंडे यांनी यापूर्वी प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पण त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

अखेर, हिवरे यांनी जमिनीवर ताबा मिळवत आज ते शेतात पेरणी करण्यासाठी जाणार होते. आपल्या मालकीची शेती बळकावून त्यात ते सोनं पिकवणार हे कृष्णा यांना सहन झालं नाही. त्यानंतर त्यांनी शिवारात जाऊन विष पाषाण करत आपलं आयुष्य संपवलं.

दरम्यान, या घटनेची पोलिसांत तक्रार करण्यात आली असून अकस्मात मृत्यूची नोंद करत तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. तर आत्महत्येपूर्वी कृष्णा यांनी चिठ्ठी लिहल्याची माहितीही देण्यात आली आहे. चिठ्ठीतही फसगत केल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे.

VIDEO: मुसळधार पावसामुळे नाशिकमध्ये पूरस्थिती, नागरिकांचे हाल

First published: July 7, 2019, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading