ओल्या दुष्काळाचा बुलडाण्यात पहिला बळी, विष प्राशन करून शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य!

ओल्या दुष्काळाचा बुलडाण्यात पहिला बळी, विष प्राशन करून शेतकऱ्यानं संपवलं आयुष्य!

. शेतीपिकांचा पंचनामाही झाला नसल्याने बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव इथं गुरुवारी ही घटना घडली.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलडाणा, 15 नोव्हेंबर : परतीच्या पावसाने चार एकरातील सोयाबिन आणि इतर पीक मातीमोल झाले. शेतीपिकांचा पंचनामाही झाला नसल्याने बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव इथं गुरुवारी ही घटना घडली. ओला दुष्काळातील खामगाव तालुक्यातील हा पहिला बळी ठरला आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानामुळे व्यथित होऊन बोरी अडगाव येथील गणेश विठ्ठल मेतकर (वय५० वर्षे) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता घडली ओल्या दुष्काळाचा खामगाव तालुक्यात हा पहिला बळी ठरला आहे. जिल्ह्यात गत पंधरवाड्यात अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली कपाशी, उडीद, मूग, तूर या हाताशी आलेल्या पिकांची परतीच्या पावसामुळे नासाडी झाली आहे.

खामगाव तालुक्यात बोरी अडगावमध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस झाला. शेतकऱ्यांचे अतिशय नुकसान झाल्याने ते व्यथित झाले होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह,आजारपण, मुलांचे शिक्षण आदी कसं चालवायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता अशातच त्यानी गुरुवारी सकाळी घरी कुणी नसताना विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नीसह, मुलगा,मुलगी असा परिवार आहे. त्याच्याकडे ४ एकर शेती आहे. सेंट्रल बँकेचे एक ते दीड लाखाचे कर्ज असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Loading...

एकीकडे सरकार स्थापन करताना शेतकर्‍यांच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी त्याच्या भागातून लोकप्रतिनिधीत्व स्वीकारलेल्या आमदारांना वेळ नाही. अशा वेळेस निराश झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्याकडे वळले आहेत. मागील दहा महिन्यात बुलडाणा जिल्ह्यात 223 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव समोर आले आहे.

===================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 15, 2019 06:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...