गारपीट आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

एकीकडे गारपीट व बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झालेले कुटुंब प्रल्हादच्या आत्महत्येमुळे हादरून गेल्याचे हृदयविदारक चित्र होतं.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Feb 17, 2018 10:36 PM IST

गारपीट आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

नागपूर, 17 फेब्रुवारी : तालुक्यातील ईसापुर खुर्द येथील एका गारपीट आमि बोंडअळीग्रस्त तसंच कर्जामुळे त्रस्त शेतकऱ्याने शासनाकडून तातडीने कुठलीही मदत आत्महत्या केल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित शेतकरी प्रल्हाद मधुकर धोटे वय ५५ वर्षे हे सततच्या नापीकीमुळे त्रस्त होते बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचे उत्पादन कमी झाले तसंच १२, १३,१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या गारपिटीने संपूर्ण पीक उद्ध्वस्त झाल्याचे पाहुन नैराश्यातून प्रल्हाद पुर्णपणे खचून गेले होते. त्यातच त्याने आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतला असावा असा अंदाज त्त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केलाय.

प्रल्हाद धोटे यांचे कुटुंबीय शेतात काम करण्यासाठी गेले होते त्यानंतर दुपारी त्याने विष प्राशन केले. सायंकाळी पाच वाजता कुटुंबीय घरी परत येताच घरात प्रल्हाद यांचा मृतदेह आढळला.

एकीकडे गारपीट व बोंडअळीमुळे उद्ध्वस्त झालेले कुटुंब प्रल्हादच्या आत्महत्येमुळे हादरून गेल्याचे हृदयविदारक चित्र होतं. गारपीट आणि बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी म्हणून काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.आशिष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले परंतु शासनाने कुठलेही पाऊल उचलले नाही.

नातेवाईकांनी प्रल्हादचा मृतदेह आ. डाॅ आशिष देशमुख यांचे ठिय्या आंदोलन स्थळी आणल्याने उपस्थित शेतकऱ्यांच्या भावना उफाळून आल्याने ते संतप्त झाले होते. यावेळी बोलताना आ. डाॅ आशिष देशमुख यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गारपीटीने उध्वस्त गावाची पाहणी करून नुकसानभरपाई जाहीर करणे अपेक्षित होते. परंतु त्यांचेकडे शेतकऱ्यांकरीता वेळ असल्याचे दिसून येत नाही.  तेव्हा मुख्यमंत्री अजुन किती आत्महत्या होण्याची वाट बघत आहे असा संतप्त सवाल आ. डाॅ आशिष देशमुख यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 17, 2018 10:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...