अमरावती, 12 जुलै- राज्याचे कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोर्शी मतदार संघातील बेनोडा शहीद येथील शेतकऱ्याने दुष्काळ व नापिकी, व कर्जाबाजारी पणाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. राजेंद्र पुंडलिक फरकाडे (वय-55) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अमरावती जिल्ह्यातील वरुड मोर्शी तालुक्यात गतवर्षी दुष्काळाने कहर केला आणि यंदा अद्याप पावसाचा थेंबही कोसळला नाही. त्यामुळे यंदाही दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ येईल का, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. याच विवंचनेतून कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या मतदारसंघातील बेनोडा शहीद येथील राजेंद्र फरकाडे या शेतकऱ्यांने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी त्यांची पत्नी मुलगा, मुलगी शेतात गेले होते. परत येताच घरात गळफास घेतलेल्या मृतदेह त्यांच्या हाती लागला. बेनोडा शहीद पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.
फरकाडे कुटुंबाकडे बेनोडा शहीद शेत शिवारात दोन एकर ओलिताची शेती आहे. यात संत्रा, कपाशी, तूरची लागवड केली होती. यावर्षी पाऊस अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने कपाशीची वाढ खुंटली तर इतर पिकाची स्थिती चांगली नाही. शेतासाठी लागलेल्या खर्च देखील निघण्यास तयार नाही. यामुळे बँकेचे असलेले एक लाख रुपयांचे कर्ज कसे फेडायचे, मुलीचं लग्न, शिवाय खासगी उसनवारी आणलेले पैसे देण्याची चिंता राजेंद्र फरकाडे यांना सतावत होती. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे सरकार बँकेने कर्ज दिले नाही तर बँकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगते. मात्र, दुसरीकडे अशा प्रकारे शेतकऱ्यांना आपली जीवनयात्रा संपवावी लागत आहे.
VIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं!