धक्कादायक! शेतकरी आत्महत्या करत होता आणि सावकार शूट करत होता व्हिडिओ!

धक्कादायक! शेतकरी आत्महत्या करत होता आणि सावकार शूट करत होता व्हिडिओ!

खासगी सावकारी फास शेतकऱ्यांच्या गळ्याला वरचेवर जास्तच आवळत आहे की काय असं म्हणायची आता वेळ आली आहे.

  • Share this:

बीड, 11 जुलै : खासगी सावकारी फास शेतकऱ्यांच्या गळ्याला वरचेवर जास्तच आवळत आहे की काय असं म्हणायची आता वेळ आली आहे. कारण, बीड जिल्ह्यात खासगी सावकारीने डोकं वर काढलं आहे. बीड जिल्ह्यातील बेलुरा गावात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बहिणीच्या लग्नासाठी सावकाराकडे शेती गहाण ठेवलेल्या  शेतकऱ्यांनी सावकारासमोरच विष प्राषण केल्याचा प्रकार घडला आहे. बरं इतकंच नाही तर हा सर्व प्रकार सावकार आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद करत होता.

या सर्व प्रकारात शेतकऱ्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सुदाम फपाळ असं मृत्यूशी झुंज देत असलेल्या या शेतकऱ्याचं नाव आहे. सुदाम यांनी आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पैसे नसल्याने खाजगी सावकार विलास फफाळ याच्याकडून 2 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. त्याबदल्यात पावणेचार एकर शेती सावकाराकडे गहाणदेखील ठेवली होती.

या दरम्यान, तब्बल 5 लाख रुपये या शेतकऱ्यांनी परतफेड केले होते. जेंव्हा शेती परत देण्याची वेळ आली तेव्हा मात्र या सावकाराची नियत हेरली आणि शेतीवर कब्जा केला. निव्वळ शेतीवर उदरनिर्वाह असलेल्या या कुटुंबासमोर आता जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झाला आहे. सावकाराच्या या वागण्यामुळे माणूसकी आता राहिली नाही असं म्हणण्याची वेळ आली आहे.

वडिलोपार्जित हक्काची जमीन डोळ्यादेखत सावकार आणि त्याचे गुंड नांगरत असताना या शेतकऱ्याला बघावलं नाही आणि हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सावकारा देखतच विष प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बाजूला असलेल्या सावकाराच्या गुंडांना त्याची थोडीही दया आली नाही. त्याला वाचवण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. या उलट नतद्रष्टांनी या सर्व प्रकारचा व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला.

हा प्रकार तब्बल एक तास चालू होता. घटनास्थळी पोलीस पोहोचले तेव्हा या शेतकऱ्याला बीडच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. वेळेत आणि व्याजासकट सावकाराचे पैसे देऊनदेखील सावकार मानसिक जाच करत होता. अनेक वेळा या शेतकऱ्याला मारहाणदेखील करण्यात आली होती. पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र, या सावकाराची दहशत एवढी मोठी आहे की पुढे कारवाई झालीच नाही.

या प्रकरणी दिंद्रुड पोलिसात जवाब दाखल करून घेण्यात आला आहे. या प्रकरणात जर सावकार दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. सावकार आणि शेतकरी हे समीकरण जिल्ह्यासाठी नवीन नाही आहे. मात्र, मजबूर आणि हतबल असलेल्या गरीब शेतकऱ्यांचे शोषण करून घेणाऱ्या सावकारावर आता काय कारवाई होईल हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.

VIDEO: बियाणं विकणाऱ्या कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक, यासोबत टॉप 18 बातम्या

First published: July 11, 2019, 8:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading