मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नगरमध्ये वाळू तस्कराची विष पिऊन आत्महत्या

नगरमध्ये वाळू तस्कराची विष पिऊन आत्महत्या

शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी आणि त्यांना आत्महत्या करू नका असं आवाहन करणारी कविता चिमुकल्यानं सादर केली पण त्याच रात्री त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली.

  • Published by:  Suraj Yadav

अहमदनगर, 28 फेब्रुवारी :  शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नयेत यासाठी एका चिमुकल्यानं कवितेच्या माध्यमातून आर्त हाक दिली पण बापाने त्याच रात्री आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत मराठी राजभाषा दिनानिमित्त स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात तिसऱीत शिकणाऱ्या चिमुकल्यानं अरे बळीराजा नको करू आत्महत्या ही स्वरचित कविता सादर केली. त्याच रात्री चिमुकल्याच्या बापाने आत्महत्या केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यात भारजवाडीतल्या हनुमान नगरच्या शाळेतील तिसरीचा विद्यार्थी प्रशांत बटुळे यानं बुधवारी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी एक कविता सादर केली. त्या चिमुकल्याचा बाप मल्हारी बाबासाहेब बटुळे यांनी मात्र त्याच रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या केलेले मल्हारी हे मनसे कार्यकर्ता होते. त्यांच्यावर वाळू तस्करीचे दहा ते बारा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.

चिमुकल्यानं सादर केलेल्या कवितेतील काही ओळी

शेतात कष्ट करूनही तुझ्या डोक्याला ताप अरे बळीराजा नको करू आत्महत्या पैसे नसूनही शाळेत शिकवता लेकरं कसे उन्हात करतात शेती पिक उगवणी मिळतात पैसे शेती करुनही तुझ्या हाताला फोड अरे बळीराजा नको करू आत्महत्या...

शाळेत शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी आणि त्यांना आत्महत्या नका करू असं आवाहन करणारी कविता सादर केल्यानंतर चिमुकल्याचं उपस्थितांनी कौतुक केलं. तिसरीत शिकत असलेल्या प्रशांतने घातलेली साद बापाला मात्र ऐकू गेली नाही. बुधवारी दुपारी त्यानं शाळेत कविता सादर केली आणि रात्री बापाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

वाचा : जहाल माओवाद्याचं समर्पण, 20 लाखांचं बक्षीस आणि 149 गुन्ह्यांची नावावर नोंद

वाचा : अवघ्या काही मिनिटांत द्राक्ष बागा उद्धवस्त, उस्मानाबाद जिल्ह्यात टोळीचा हैदोस

First published:

Tags: Farmer