पुण्यात माजी सरपंचानं राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

पुण्यात माजी सरपंचानं राहत्या घरी गळफास घेऊन केली आत्महत्या, कारण अस्पष्ट

खेड तालुक्यातील भांबोलीचे माजी सरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रदीप ज्ञानेश्वर नवरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

  • Share this:

पुणे, 13 मे- खेड तालुक्यातील भांबोलीचे माजी सरपंचाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रदीप ज्ञानेश्वर नवरे असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भांबोली हे गाव भामा खोऱ्यात आहे. प्रदीप ज्ञानेश्वर नवरे यांनी राहत्या घरातील शेडमध्ये रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.

बिअर बारचा पत्ता व्यवस्थित न सांगितल्याने तरुणावर गोळीबार

बिअर बारचा पत्ता व्यवस्थित न सांगितल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. अहमदनगरहून आलेल्या तिघांनी अल्पवयीन तरुणावर गोळीबार केला. गोळीबार केल्याचा गंभीर प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात सनी चौधरीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या तरुणांना बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये जायचे होते. मात्र, बारचा पत्ता व्यवस्थित सांगितला नाही, या कारणावरून अहमदनगरहून आलेल्या तिघांनी एका अल्पवयीन मुलावर छऱ्याच्या एअरगनने फायर करून जखमी केले. त्यानंतर त्याला खडकी येथील मरीआई गेटजवळ टाकून त्यांनी पोबारा केला.

शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमी युवकाने आधी घाबरून खरा प्रकार सांगितला नाही. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यावर खरा प्रकार उघडकिस आला.

याप्रकरणी 17 वर्षीय सनी चौधरी (रा. बिबवेवाडी ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत सनीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तर याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी अंबादास अशोक होंडे (वय-28, रा. दापोडी, मूळ अहमदनगर) याला अटक केली आहे. पोलिस त्याच्या इतर 2 साथीदारांचा शोध घेत आहेत.

तब्बल 40 वर्षे पाण्याखाली होतं हे मंदिर, दुष्काळाची दाहकता दाखवणारा VIDEO

First published: May 13, 2019, 6:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading