बीड, 14 मे : कोरोनाच्या अडीच वर्षानंतर पहिल्यांदा मुख्यमंत्री (Chief Minister) मास्क काढून, आपला चेहरा दाखवणार आहेत. मुख्यमंत्री आज सभा घेऊन मास्क काढून, जसा चंद्र आपला मुखडा दाखवतो तसा आपला मुखडा जनतेला दाखवणार आहेत, अशी जोरदार टीका रयत क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray) केली आहे. लोककल्याणकारी राज्य त्यांना निर्माण करता आलं नाही. हे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे, असा आरोपही सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत यांनी आज बीडच्या हिंगणगावमध्ये जाऊन, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. गेल्या 3 दिवसापूर्वी नामदेव जाधव या शेतकऱ्याने ऊस जात नसल्याने आत्महत्या केली होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी आता इंडियाच्या बाहेर येऊन भारतात यावं आणि जनतेचे शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत. मुख्यमंत्री आज सभा घेऊन मास्क काढून, जसा चंद्र आपला मुखडा दाखवतो तसा आपला मुखडा जनतेला दाखवणार आहेत, अशी जोरदार टीका शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. तर सध्या जे शेतकरी आत्महत्या करत आहेत, त्याला फक्त सरकार जबाबदार असल्याचंही खोत यावेळी म्हणाले.
आज मुख्यमंत्र्यांची मुंबईत जाहीर सभा -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची 14 मे रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मुख्यमंत्री विरोधकांच्या सर्व टीकांना प्रत्युत्तर देणार आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे शिवसेनेकडून या सभेचा आता तिसरा टिझर लाँच करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra politics, Sadabhau khot, Shivsena, Uddhav thackeray