मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल; राजू शेट्टींचा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा

...अन्यथा उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल; राजू शेट्टींचा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा

7 ऑक्टोबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मराठवाडा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी ते हा दौरा करणार आहेत.

7 ऑक्टोबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मराठवाडा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी ते हा दौरा करणार आहेत.

7 ऑक्टोबरपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मराठवाडा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी ते हा दौरा करणार आहेत.

सांगली, 30 सप्टेंबर : नुसत्या घोषणा करून पोट भरत नाही. मदत द्या, अन्यथा सरकारला उग्र आंदोलनाला सामोरं जावं लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju shetti) यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आज सांगलीत (Sangli latest news) दिला. राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषामध्ये पडून असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या निधीचा केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी सढळ हातानं वापर करावा, असेही ते म्हणाले.

7 ऑक्टोबरपासून राजू शेट्टी मराठवाडा दौरा करणार आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी ते हा दौरा करणार आहेत. महाराष्ट्रमध्ये आतापर्यंत झालेल्या सर्वच मुख्यमंत्र्यांनी 'पाणी आडवा, पाणी जिरवा'चा नारा दिला होता, त्यामुळे आणि जलयुक्त शिवारच्या कामामुळे मराठवाड्यात पूर आला, असे म्हणणे घाईगडबडीचे ठरेल, असेही ते यावेळी म्हणाले.

हे वाचा - मी धमकी देत नाही, मात्र मागणी जरूर करतो; शिवसेनेच्या आरोपांवर भुजबळांचा विनंतीवजा इशारा

दरम्यान, ऊसाची एफआरपी एक रकमीच मिळाली पाहिजे, यासाठी घटस्थापनेपासून राज्यभरात ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तीपिठाची’ या नावाने जागर यात्रा काढणार असल्याची माहिती बुधवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत दिला होता. राज्यातील पूरग्रस्तांना दसऱ्यापर्यंत मदत न दिल्यास राज्यात कोणत्याही मंत्र्यांची दिवाळी गोड होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

हे वाचा - औषधे खरेदी करताना केवळ Expiry Date नका पाहू, पाकिटावरील चिन्ह सुद्धा पहा अन्यथा होईल नुकसान

कारखानदारांनी साखरेला 3500 रुपये दर मागितला असताना बाजारात त्यांची साखर 3800 रुपये दराने विकली जात आहे. त्यामुळे कारखानदारांना चांगले दिवस आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांनाही एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे. त्याचे तुकडे करण्याचा केंद्र, राज्य सरकार आणि साखर कारखानदारांचा हा डाव आम्ही हाणून पाडू असा इशाराही त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिला.

First published:

Tags: Raju Shetti, Sangli