सागर सुरवसे, सोलापूर, 9 डिसेंबर : 'शरद पवार जसे चांगल्या कामाचे श्रेय घेतात तसे अपश्रेय घेणेही गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्येला शरद पवारच जबाबदार आहेत,' असा आरोप करत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. चांगल्या कामाचे श्रेय आम्ही त्यांना देवू, मात्र शेतकरी आत्महत्यांचीही जबाबदारी त्यांनी स्वीकारावी, असं रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलं आहे.
'शरद पवार हे गेल्या 50 वर्षांपासून देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात आहेत. अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शरद पवार हे स्वत:ला शेतकऱ्यांचे जाणते राजे म्हणवून घेतात. ते जसं स्वत:कडे विकासाचं श्रेय घेतात, तसंच शेतकऱ्यांबाबत आलेल्या अपयशाची जबाबदारीही त्यांनी घ्यावी,' असं म्हणत रघुनाथदादा पाटील यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. तसंच आगामी काळात शेतकरीविरोधी कायदे दूर करण्यासाठी आपण व्यापक चळवळ उभा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे कार्यालय जाळले, अक्कलकुव्वा शहरात तणाव, जमाव बंदी लागूमोदींवरही निशाणा
रघुनाथदादा पाटील यांनी शेतकरी प्रश्नावरून शरद पवार यांच्यासह मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. 'या देशात सरकार बदललं. पण फक्त नेत्यांची नाव बदलली. शेतकरीविरोधी कायदे आहेत तसेच आहेत. नेहरुंपासून मोदींपर्यंत सर्वच राज्यकर्त्यांनी शेतकरी विरोधी धोरणे राबविली,' असा आरोप रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.