तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने घेतला जीव, आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची दहशत

तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा बिबट्याने घेतला जीव, आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याची दहशत

या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

  • Share this:

बीड, 24 नोव्हेंबर : तुरीच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या बीडमधील शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी उघड़कीस आली असून नागनाथ गहिनिनाथ गर्जे (40 ) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जे हे गावाजवळच्या वाघदरा या शेतात तुरीला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवल्याने यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारपासून गेलेले गर्जॅ सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेतात पाहणी केली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.

बिबट्याच्या हल्ल्यात चेहरा आणि मान बिबट्याने खाल्ली होता. सर्व चेहरा छिन्न विच्छिन्न झाला होता .

मयत हे आष्टी पंचायत समितीच्या मोराळा गनाच्या पंचायत समिती सदस्या आशा गर्जे यांचे पती आहेत. आष्टी तालुक्यात बिबाट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: November 24, 2020, 11:36 PM IST
Tags: beedfarmer

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading