मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लक्षवेधी होळी, पीडित शेतकऱ्यांनी 'या' नेत्याचे फोटो होळीला लावून ठोकली बोंब

लक्षवेधी होळी, पीडित शेतकऱ्यांनी 'या' नेत्याचे फोटो होळीला लावून ठोकली बोंब

चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांची होळी लक्षवेधी ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या फोटोला गावकऱ्यांचा प्रणाम करून...

जळगाव,10 मार्च: चाळीसगाव तालुक्यातील सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांची होळी लक्षवेधी ठरली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या फोटोला गावकऱ्यांचा प्रणाम करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील आणि उन्मेष पाटील यांचे फोटो होळीला लावून शेतकऱ्यांनी दहन केले आहेत. सोमवारी होळीच्या निमित्ताने प्रतिकात्मक तत्कालीन सरकारचे हे दहन करण्यात आले आहे. चाळीसगाव तालुक्यातल्या बोढरे या गावात सोलर प्रकल्प पीडित शेतकऱ्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, खासदार उन्मेष पाटील यांचे फोटो होळीला लावून दहन केले. होळी पेटताच शेतरऱ्यांनी एकच बोंब ठोकली. पाहा... पीडित शेतकऱ्यांची लक्षवेधी होळीचा VIDEO हेही वाचा..कोरोनाची भीती वाढली; मुंबईच्या ओला ड्रायव्हरलाही संसर्ग, पुण्यात रुग्णांची संख्या 5 फडणवीस सरकारच्या काळात धनाढ्य उद्योगपतींना सोलर प्रकल्पासाठी गैरमार्गाने शेतकऱ्यांची फसवणूक करून चाळीसगाव तालुक्यातील मौजे बोढरे, पिंपरखेड, शिवापूर, लोंजे गावातील सुमारे 1200 एकर शेतजमिनी कवडीमोल भावात लाटल्याचा निषेधार्थ या लक्षवेधी होळीचे आयोजन करण्यात आलं होतं. मागील सरकारमधील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन ,उन्मेष पाटील यांच्या फोटोचे दहन करण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारकडून पीडित शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेसमोर शेतकऱ्यांनी हात जोडून नमस्कार केला. हेही वाचा..‘महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत होणार बंडखोरी ’
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Farmer, Maharashtra politics

पुढील बातम्या