संपकरी शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची उद्या सकाळी घेणार भेट

संपकरी शेतकरी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची उद्या सकाळी घेणार भेट

पुणतांबाचे शेतकरी तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत. संपकरी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.

  • Share this:

02 जून : पुणतांबाचे शेतकरी तिसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. पण उद्या शनिवारी सकाळी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. पण, संप मगे घेणार असं कुणी समजू नये अशी माहिती शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिली.

कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीसाठी राज्यातला शेतकरी पहिल्यांदाच संपावर गेलाय. आज संपाचा दुसरा संपला. पण सरकारकडून कोणतीही हालचाल झाली. नगर जिल्ह्यातील ज्या पुणतांबा गावातून शेतकऱ्यांची संपाची सुरूवात झाली. या गावातून एक शेतकरी शिष्टमंडळ मुंबईत पोहचलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आज रात्री 10 वाजता चर्चा होणार होती मात्र ही बैठक होऊ शकली नाही. संपकरी शेतकरी शिष्टमंडळ आता उद्या सकाळी 9 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.  मुख्यमंत्र्यांसोबत भेट म्हणजे संप मागे घेणार असे कुणीही समजू नये.  मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू झाली तरी शेतकरी संप सुरूच राहील आणि 5 जूनला न भूतो न भविष्यती असा बंद होईल असा इशारा  शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांनी दिला.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपात एक नवीन ट्विस्ट आला. आणि हे ट्विस्ट आहे अण्णा हजारे नावाचं. अण्णांनी शेतकरी संपाला पाठिंबा दिलाय पण सोबतच शेतकऱ्यांच्या बाजूनं सरकारसोबत चर्चेला तयार असल्याचंही म्हटलंय. पण अण्णांची भूमिकेवर साशंकता व्यक्त केली जातेय.

First published: June 2, 2017, 10:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading