मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शेतकऱ्यानं केली कमाल! चक्क लातूरमध्ये घेतलं तब्बल 2 टन काजूचं उत्पन्न; कमवले भरघोस पैसे

शेतकऱ्यानं केली कमाल! चक्क लातूरमध्ये घेतलं तब्बल 2 टन काजूचं उत्पन्न; कमवले भरघोस पैसे

लातूरमधल्या एका शेतकऱ्याने स्वतः केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध केलं आहे

लातूरमधल्या एका शेतकऱ्याने स्वतः केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध केलं आहे

लातूरमधल्या एका शेतकऱ्याने स्वतः केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध केलं आहे

लातूर, 06 सप्टेंबर: काजू (Cashew) म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवते ती काजूगरांची वैशिष्ट्यपूर्ण चव. नुसते काजूगर (Cashewnut) किंवा खारवलेले काजूगर तर छान लागतातच; पण आइस्क्रीमपासून भाजीपर्यंत वेगवेगळ्या पदार्थांची पौष्टिकता आणि स्वाद वाढवण्याचं काम काजूगर करतात. काजूची शेती म्हटलं तर आपल्या डोळ्यांसमोर येतात कोकण (Kokan) आणि गोव्यातल्या (Goa) काजूच्या बागा (Cashew Farms). देशभरातही किनारपट्टीच्या (Coastal Region), तसंच पाणीटंचाई नसलेल्या भागांमध्येच काजूची लागवड मोठ्या प्रमाणावर आहे; मात्र मराठवाड्यातही काजूची शेती चांगल्या प्रकारे केली जाऊ शकते आणि त्यातून उत्तम उत्पादनही मिळू शकतं. लातूरमधल्या एका शेतकऱ्याने स्वतः केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध केलं आहे. 'टीव्ही नाइन हिंदी'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. या प्रयोगाबद्दल जाणून घेण्याआधी थोडं काजूच्या उत्पादनाबद्दल जाणून घेऊ. जगात आयव्हरी कोस्ट (Ivory Coast) हा देश काजूचं सर्वांत जास्त उत्पादन करतो. त्याखालोखाल भारताचा (India) काजू उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो. काजूच्या प्रक्रिया उद्योगात (Cashew Processing) मात्र भारत पहिल्या स्थानावर आहे. काजूच्या झाडांना किनारी भागातलं दमट हवामान (Humid Climate) चांगलं मानवतं. त्यामुळे देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर काजूचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. देशाचा विचार केला, तर उत्पादनात महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर असून, वार्षिक सुमारे सव्वादोन लाख टन एवढं काजू उत्पादन महाराष्ट्रात होतं. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रातलं काजू उत्पादन प्रामुख्याने किनारपट्टीच्या भागात म्हणजेच कोकणातल्या जिल्ह्यांत घेतलं जातं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत; मात्र योग्य काळजी घेतली, तर मराठवाड्यासारख्या कमी पावसाच्या, कोरडं हवामान असलेल्या आणि किनारपट्टी नसलेल्या भागातही काजू उत्पादन चांगलं होऊ शकतं, हे लातूरमधल्या (Latur) विष्णू कदम या शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलं आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातल्या उमरगा इथे राहणाऱ्या कदम यांनी 2016 साली कोकणातून काजूची दर्जेदार जातीची कलमं आणून लागवड केली होती. हे वाचा - भयंकर! पतीची संतापात पत्नीला जबर मारहाण; घरघुती वाद विकोपाला; पत्नीनं गमावला जीव दीड एकर नापीक जमिनीवर त्यांनी काजूच्या 100 कलमांची लागवड केली. त्या कलमांची काळजी कशी घ्यायची, याबद्दल त्यांनी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं, तसंच स्वतः अभ्यास केला. त्यानुसार त्यांनी चार वर्षं त्या कलमांचं योग्य रीतीने व्यवस्थापन केलं. त्यांची मेहनत फळाला आली आणि यंदा त्यांची काजूची झाडं फळांनी लगडली. यंदा उत्पादनाच्या पहिल्याच वर्षी त्यांनी दोन टन काजूंचं उत्पादन घेतलं असून, 80 हजार रुपयांची कमाई केली आहे. उत्पादनाचं हे पहिलंच वर्ष असल्याने येत्या काळात हे उत्पादन (Cashew Farming) आणखी वाढेल आणि आणखी जास्त नफा होईल, असं कदम यांनी 'टीव्ही नाइन हिंदी'ला सांगितलं. मराठवाड्यात काजूचं उत्पादन घेण्याचा कदम यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आजूबाजूच्या गावांतल्या शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे. अनेक शेतकरी कदम यांच्याकडे येऊन त्यांची काजूबाग पाहत आहेत. कदमदेखील त्यांना काजूच्या शेतीची सगळी माहिती देत आहेत. तसंच, स्वतःला आलेले अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना सांगत आहेत. त्यामुळे आणखीही काही शेतकऱ्यांना काजू लागवडीची इच्छा निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातले काजूगरही बाजारात दिसायला लागले, तर नवल वाटायला नको.
First published:

Tags: Farmer, Latur, Success

पुढील बातम्या