धुळे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

धुळे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांचा विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

धुळे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालपूर गावात ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 22 जुलै- धुळे जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालपूर गावात ही घटना सोमवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. दोंडाईचा व नंदुरबार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. सिंचन विहिरीचे अनुदान मिळत नसल्याने शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांच्यासह पत्नी आणि दोन मुलांनी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. चौघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चौघांची प्रकृती स्थिर आहे.

मिळालेली माहिती अशी की, गेल्या अनेक दिवसांपासून प्रकाश पोपट धनगर हे अनुदानासाठी पाठपुरावा करत होते. अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे धनगर कुटुंबावर आत्महत्येची वेळ आहे. सिंचन विहिरीच्या अनुदानासाठी शेतात खोदकाम सुरू असलेल्या विहिरीजवळच येथील शेतकरी प्रकाश धनगर हे पत्नी योगिता धनगर, मुलगा भूषण धनगर व निखिल धनगर यांच्यासह सोमवारी त्यांच्या शेतातील विहिरीजवळ पोहचले त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. शेतकरी प्रकाश पोपट धनगर यांना शेतात सिंचन विहीर मंजूर झाली असून शिंदखेडा पंचायत समितीच्या अभियंत्याकडून आखणी करून खोदकामही झाले आहे. सर्व अटींचे पालन करूनही कोणतेही अनुदान बॅंक खात्यात जमा न झाल्याने या कुटुंबाने हे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केला होता आत्मदहनाचा प्रयत्न...

यापूर्वीही एक एप्रिल रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकाश धनगर यांनी पत्नीसह अंगावर रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला होता. मात्र त्यानंतरही न्याय न मिळाल्याने त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागले आहे.

औरंगाबादमध्ये 'जय श्रीराम'वरून बेदम मारहाणीसह धमकावलं, पाहा घटनास्थळावरचा VIDEO

Published by: Sandip Parolekar
First published: July 22, 2019, 4:42 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading