सातबाऱ्यावरचं नाव वगळलं गेल्यानं शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू

सातबाऱ्यावरचं नाव वगळलं गेल्यानं शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू

तलाठी आणि तहसीलदारांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शेतकरी आणि गावकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे गावात तणाव निर्माण झालाय.

  • Share this:

विशाल माने, परभणी 23 जुलै : सातबारावरील शेतकऱ्याचे नाव अचानकपणे वगळण्यात आल्याने तणावात आलेल्या शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातल्या पाथरी इथं ही घडली. या घटनेनंतर शेतकरी आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. तर या प्रकरणात दोषी असलेल्यांच्या विरोधात कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिल्याने अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झालाय.

पाथरी तालुक्यातील तुरा या गावचे शेतकरी मुंजाभाऊ चाळक असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. चाळक हे आज दुपारी पाथरी येथे पिक विमा भरण्यासाठी आले होते. त्यावेळी तुरा गावच्या तलाठ्याच्या कार्यालयांमध्ये जाऊन त्यांनी सातबाराची मागणी केली. त्यावेळी सातबारावरील आपले नाव हटलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांना धक्काच बसला.

बायकोसाठी आपलं गाव सोडणाऱ्या नवऱ्यांची संख्या वाढतेय! 'हे' राज्य आहे आघाडीवर

यासंदर्भात तलाठ्याकडे विचारणा करून त्यांनी तहसीलदारांकडे तोंडी तक्रार दिली. परंतु मनामध्ये असलेली भीती तशीच राहिली, त्यानंतर परत तलाठी कार्यालयात आल्यावर मुंजाभाऊ चाळक यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर तुरा गावातले शेतकरी आणि नागरिकांनी पाथरी इथल्या दवाखान्यात गर्दी केली होती. त्यावेळी तलाठी आणि तहसीलदारांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा शेतकरी आणि गावकऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे गावात तणाव निर्माण झालाय.

येत्या 48 तासांत मुंबईसह या भागांत पडणार मुसळधार पाऊस

बिड जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे बीड जिल्ह्यात दोन तरुण शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं. जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्या थांबायचं नाव घेतं नाही. यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. वडवणी तालुक्यांतील देवडी येथील नागेश भिकाजी नाईकवाडे (25) आणि धारूर तालुक्यांतील योगेश किशन राठोड (20) या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय.

नागेश नाईकवाडेवर काही हजारांचं कर्ज होतं. ते फेडणं त्याला शक्य होत नव्हतं. पावसाचा लहरीपणा, मालाला नसलेला भाव आणि नापीकीने तो त्रस्त झाला होता. सकाळी सहा वाजता शेतात गेला असताना विषारी औषध प्राशन करुन त्याने आत्महत्या केली. नागेश याच्यामागे पाच भाऊ, एक बहीण व आई-वडील असा परिवार आहे.

VIDEO : माहितीच्या अधिकारात बदलामुळे अण्णा नाराज, मोदी सरकारवर केली टीका

तर दुसरी घटना धारूर तालुक्यांतील मोहखेड धनखिळा तांडा येथे घटली. योगेश किशन राठोड या 20 वर्षांच्या तरुणाने आर्थिक विवंचनेतून शेतात गळफास घेवून जीवन संपवले. त्याचे आंबेजोगाई येथे Bsc चे शिक्षण सुरु होते. मागच्या वर्षी शेतात काही पिकले नाही. कॉलेज सोडून ऊस तोडणीला जावं लागले या वर्षी सुध्दा तशीच वेळ येते की काय? असं त्याला सारखं वाटतं होतं. त्यांतच घरातलं दारिद्र यामुळे आर्थिक विवंचनेतून गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 23, 2019, 7:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading