मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या मुलाचं टॉवरवर चढून आंदोलन

मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटलांच्या मुलाचं टॉवरवर चढून आंदोलन

दिवंगत धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांचा मुलगा असलेल्या नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

  • Share this:

धुळे, 7 डिसेंबर : सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केले नाही म्हणून मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन केलं आहे. विखरण गावातील मोबाईल टॉवरवर चढून नरेंद्र पाटील यांनी आंदोलन केलं आहे.

दिवंगत धर्मा पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांचा मुलगा असलेल्या नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

सरकारकडून कोणतीही मागणी पूर्ण झाली नाही. तसंच मंत्र्यांनी नुकसान भरपाई देण्याचं दिलेलं आश्वासनही पाळण्यात आलं नाही. म्हणून नरेंद्र पाटील यांनी हे आंदोलन केलं आहे. आश्वासनाची पूर्तता न करणाऱ्या सरकारच्या निषेधासाठी हे आंदोलन असल्याचं नरेंद्र पाटील यांचं म्हणणं आहे.

नरेंद्र पाटील यांना टॉवरवरून खाली उतरवण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. अजूनपर्यंत त्यांना खाली उतरवण्यात आलेलं नाही.

दरम्यान, धर्मा पाटील या वृद्ध शेतकऱ्याने मंत्रालय परिसरातच किटकनाशक घेऊन आत्महत्या केल्यानं महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. धुळे ऊर्जा प्रकल्पात त्यांची जमीन अधिगृहित करण्यात आली होती. पण त्यांना या जमिनीचा अतिशय कमी मोबदला मिळाला होता. म्हणूनच वाढीव नुकसानभरपाईसाठी ते मंत्रालयात खेटे मारत होते. या सर्वाला कंटाळून धर्मा पाटील यांनी आपलं जीवन संपवलं.

धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर धुळे जिल्हा प्रशासनाने ऊर्जा प्रकल्प बाधित शेतकऱ्याच्या वाढीव अनुदानाचा प्रस्ताव तयार केला. कोरडवाहू साठी हेक्टरी 10 लाख, बागायतीसाठी हेक्टरी 15 लाख रुपये निर्णय करण्यात आला होता. धर्मा पाटील यांच्यासह ज्या शेतकऱ्यांना या प्रमाणे पैसे मिळाले नसतील त्यांना वाढीव अनुदान दिले जाणार असल्याचाही घोषणा केली गेली.

घोषित शासकीय अनुदान आणि शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मिळालेलं अनुदान यात अनेक ठिकाणी तफावत आहे. अन्याय झालेल्या शेतकऱ्यांना तफावात रक्कम ही व्याजासह दिली जाणार असल्याचं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं होतं.

VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात

First published: December 7, 2018, 4:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading