'पुन्हा आणुया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

'पुन्हा आणुया आपले सरकार' टी-शर्ट घालून शेतकऱ्याची आत्महत्या

पुन्हा आणूया आपले सरकार असं भाजपचा टी-शर्ट आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याने घातला आहे. कर्जबाजारीपणातून त्यानं आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात आहे.

  • Share this:

अमोल गावंडे, प्रतिनिधी

बुलढाणा, 13 ऑक्टोबर : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळीच एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पुन्हा आणूया आपले सरकार असं लिहलेला भाजपचा टी-शर्ट आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याने घातला आहे. राज्यात सध्या विधानसभेचं वारं असून शेतकऱ्यांनाही अनेक आश्वासनं देण्यात आली आहेत. मात्र, सध्या प्रचाराच्या धामधुमीतच शेतकरी आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या जिथं झाली त्याच मतदार संघामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होईल.

जळगाव जामोद इथून कामगार मंत्री डॉ संजय कुटे आमदार आहेत. शेगाव तालुक्यातील खातखेड इथं रविवारी सकाळी 11 वाजता हा प्रकार उघडकीस आला. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजू ज्ञानदेव तलवारे असं 35 वर्षीय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. कर्जबाजारीपणामुळे त्याने आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रशासनाकडून अद्याप कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही. प्रशासनाची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल.

दुसरीकडे, शनिवारी संध्याकाळी येवल्यातही एका तरुण शेतकऱ्याने कर्जबारीपणामुळे आत्महत्या केली. त्यामुळे भर निवडणुकांमध्येही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने शेतकऱ्यांसाठी झालेल्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

इतर बातम्या - मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात बिअर बारला उत, तब्बल 26 जणांवर धडक कारवाई

Published by: Renuka Dhaybar
First published: October 13, 2019, 2:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading