कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्या

कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे.

  • Share this:

अमरावती, 19 जुलै : कर्जबाजारी आणि सततच्या नापिकीला कंटाळून एका शेतकऱ्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. भास्कर राजणकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील अशोक नगर येथील ही घटना आहे.यावर्षी कशीबशी आर्थिक तडजोड करून पाच एकर शेतात सोयाबीन आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र पावसाने दडी मारल्याने शेतातलं पीक करपलं. हा धक्का सहन न झाल्यानं राजणकर यांनी विदर्भ नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. राजणकर यांच्यावर सोसायटीचे आणि अन्य उधारी मिळून एक लाख रुपये कर्ज आहे. भास्कर यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

(पाहा :VIDEO: विद्यार्थिनीची रोडरोमिओनं काढली छेड; स्थानिकांनी केली धुलाई)

उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी काढला होता मोर्चा

दरम्यान,  पीक विम्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीविरोधात शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला होता. 17 जुलै रोजी बीकेसीमधील विमा कंपनीच्या मुख्यालयावर शिवसेनेनं महामोर्चा काढला होता. यावेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले होते की, 'राज्यातील सर्व विमा कंपन्या आणि बँकांना मी हात जोडून विनंती करतो, आम्हाला आक्रमक व्हायला भाग पाडू नका. ज्या शेतकऱ्यांना पीकविमा आणि ज्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. त्यांच्या नावांची यादी संबंधित कंपन्यांनी आणि बँकांनी 15 दिवसांत आपल्या कार्यालयाच्या दरवाजावर लावावीत, अन्यथा हा मोर्चाच बोलेल' अशा आक्रमक शब्दांत उद्धव ठाकरे यांनी इशारा दिला होता.

(पाहा :दारूची अवैध वाहतूक करणारे 7 जण ताब्यात, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी)

VIDEO: अजित पवार म्हणाले, रामदास आठवलेंसारखं जमायला लागलं बुवा...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2019 01:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading