• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • ड्रायव्हर म्हणून नोकरी केली पण कर्ज काही फिटेना, अखेर शेतकऱ्याने विष केले प्राशन

ड्रायव्हर म्हणून नोकरी केली पण कर्ज काही फिटेना, अखेर शेतकऱ्याने विष केले प्राशन

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते.

 • Share this:
  लातूर, 18 सप्टेंबर : कर्जबाजारी झाल्यामुळे पु्ण्यात चालक म्हणून नोकरी केली. पण, कर्ज काही केल्या कमी होत नव्हते. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून एका 40 वर्षीय शेतकऱ्याने (farmer  committed suicide) आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना लातूरमध्ये (latur) घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील नागरसोगा गावातील एका 40 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली.  लालगिर माधवगिर गिरी असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. लालगिर गिरी यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते.  विष पिल्यानंतर ही बाब शेजाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा करून घरच्यांना आवाज दिला. त्यानंतर तातडीने गिरी यांना लातूर येथील शासकीय रुग्णालयात  दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज मृत्यू झाला. पाकिस्तानची आपल्याच पायावर कुऱ्हाड, न्यूझीलंड सीरिज रद्द व्हायचं खरं कारण लालगिर गिरी हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांच्याकडे 1 हेक्टर 53 एक्कर जमीन आहे. अल्पभूधारक असल्यामुळे शेतीवर भागत नाही म्हणून ते खाजगी गाडीवर पुणे येथे चालक म्हणून काम करीत होते. पण कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊननंतर ते गावात येऊन राहिले होते. त्यांच्यावर बँकेचे आणि काही खाजगी कर्ज झाले होते. Zomato आणि Swiggy या कंपन्यांना भरावा लागणार टॅक्स; ग्राहकांवर काय होणार परिणाम? कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली असल्याचे सांगण्यात येतंय. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलांचं जिवन मात्र आता असहाय्य्य बनलंय आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करत आहे.
  Published by:sachin Salve
  First published: