Home /News /maharashtra /

ज्या पिकांवर प्रेम केलं, त्याच शेतात शेतकऱ्याने संपवले जीवन

ज्या पिकांवर प्रेम केलं, त्याच शेतात शेतकऱ्याने संपवले जीवन

एकीकडे डोक्यावर कर्जाचं ओझं तर दुसरीकडे पेरणीसाठी पिक कर्ज देखील मिळत नाही.

मनमाड, 21 जून : एकीकडे डोक्यावर कर्जाचं ओझं तर दुसरीकडे पेरणीसाठी पिक कर्ज देखील मिळत नाही, त्यामुळे नैराश्यग्रस्त झालेल्या सटाणा-बागलाण तालुक्यातील चिराई इथं राहणाऱ्या एका शेतकऱ्याने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनिल अहिरे यांच्याकडे अडीच एकर जमीन असून तिच्यावर विविध बँक आणि सोसायटी चे 3.5 ते 4 कर्ज लाख होते. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अनिल अहिरे हे सकाळी 6 वाजता आपल्या शेतात गेले होते. शेतात असलेल्या घरात त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिल अहिरे पश्चात त्यांना पत्नी, एक मुलगा आणि मुलगी आहे. भल्या मोठ्या जहाजाची लाटांनी केली दैना, मोठ्या दुर्घटनेची भीती, पाहा हा VIDEO अनिल अहिरे यांच्या नावे चिराई शिवारात अडीच एकर जमीन होती. त्यांच्यावर 2 लाखांचे कर्ज होते. तर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत 15 हजाराचे कर्ज थकीत होते. त्याचबरोबर महिंद्रा रूरल हौसिंग फायनन्सकडून त्यांनी 150000 लाखांचे कर्ज घेतले होते. एकीकडे डोक्यावर कर्जाचं ओझं तर दुसरीकडे पेरणीसाठी पिक कर्ज देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कदाचित या नैराश्येतून या शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलत आपली जीवन यात्रा संपवली असावी, अशी चर्चा या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये होती. धक्कादायक! वधू-वराची कार नदीत गेली वाहून, संसार थाटण्याआधीच... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिल अहिरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे. संपादन - सचिन साळवे
First published:

Tags: मनमाड

पुढील बातम्या