Home /News /maharashtra /

कृषीमंत्री गुवाहाटीत पाहताय झाडी..डोंगर अन् राज्यात 55 हजारांसाठी शेतकऱ्याने घेतला गळफास

कृषीमंत्री गुवाहाटीत पाहताय झाडी..डोंगर अन् राज्यात 55 हजारांसाठी शेतकऱ्याने घेतला गळफास

दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ 15 पोती धान उत्पादन झाले असल्याने देवरामच्या मनावर विपरीत परिणाम झाला.

दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ 15 पोती धान उत्पादन झाले असल्याने देवरामच्या मनावर विपरीत परिणाम झाला.

दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ 15 पोती धान उत्पादन झाले असल्याने देवरामच्या मनावर विपरीत परिणाम झाला.

    नेहाल भुरे,प्रतिनिधी भंडारा, 27 जून : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये  अभुतपूर्व असा गोंधळ निर्माण झाला आहे. सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे (shivsena) नेते आणि मंत्र्यांनी बंड पुकारला आहे. गेल्या 7 दिवसांपासून हा ड्रामा सुरू आहे. पण, दुसरीकडे ऐन पेरणीच्या हंगामामध्ये एका शेतकऱ्याने अवघ्या 55 हजार रुपयांची गळफास (Farmer commits suicide) घेतल्याची मन हेलावून टाकणारी घटना भंडाऱ्यात (bhadara) घडली आहे. उन्हाळी धानाचे झालेल्या अत्यल्प उत्पादनामुळे कर्जदारांचे कर्ज कसे चुकते करायचे या विवंचनेत सापडलेल्या त्रस्त शेतकऱ्याने अखेर स्वतःच्या शेतावरील विहिरीत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील टेंभरी येथे घडली. देवराम तुळशीराम शिंगाडे वय 58 वर्ष असं मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे. मृतक देवराम शिंगाडे हे अनेक वर्षापासून शेतीसह पशू व्यवसाय सुद्धा करायचे. या वर्षी 3 एकर जागेत उन्हाळी धानाची रोवणी करून त्यावर जवळपास साठ हजार रुपयाचे वर खर्च केले. यासाठी सहकारी संस्थेच्या जवळपास 55 हजार रूपयांचा कर्ज ही घेतले. मात्र दिवसरात्र मेहनत करूनही तीन एकरात केवळ 15 पोती धान उत्पादन झाले असल्याने देवरामच्या मनावर विपरीत परिणाम झाला. गेल्या चारपाच दिवसांपासून ते आर्थिक विवंचनेत सापडले होते. दरम्यान गावाशेजारी असलेल्या शेतावरील विहिरीत नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. देवराम यांनी आत्महत्या केल्याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली असता परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान लाखांदूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या