जालना, 24 नोव्हेंबर: अंबड तालुक्यातील टाका येथे एक दु:खद घटना घडली आहे. शेतात जाताना ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून चालकासह शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. रावसाहेब बढे (60) आणि निशाण बाबू शेख अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. शेतात रोटा मारण्यासाठी रावसाहेब बढे निघाले असता त्यांच्यावर काळानं झडप घातली.
हेही वाचा...3 वर्षाच्या मुलाचा खेळता खेळता विहिरीत गेला तोल, क्षणात झालं होत्याचं नव्हतं..बेमोसमी पाऊस उघडल्यानं शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी वेग घेतला आहे. रब्बी हंगामातील गहू पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. ही लगबग सुरू असल्यामुळे अंबड तालुक्यातील टाका येथील शेतकरी रावसाहेब किसन बढे तर चालक निशान बाबु शेख या दोघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
रावसाहेब बढे यांच्या शेतात रोटाव्हेटर हाण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन निघाले होते. गावपासून काही अंतरावर वसंतराव म्हस्के यांच्या शेताजवळ येताच ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटलं. ट्रॅक्टर थेट रस्त्यावर पलटी मारुन रस्त्याकडील नाल्यात जावून पडलं. ट्रॅक्टरखाली रावसाहेब बढे आणि निशान हे दोन्ही दबले गेले. दोघांचा जागेवरच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दबलेल्या दोघांनाही बाहेर काढून उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
हेही वाचा...निधी मी आणला पण... पंकजा मुंडेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर साधलं शरसंधानरोटाव्हेटर हाण्यासाठी गावातील ट्रॅक्टर असून आजपर्यंत मालकानं त्यावर चालक ठेवला नव्हता. मालक स्वत: ट्रॅक्टर चालवत होता. मात्र, आज पहिल्यांदाच चालक निशाण बाबु शेख ट्रॅक्टर घेऊन शेतात गेला आणि त्याच्यासह रावसाहेब बढे यांच्यावर काळानं घाला घातला. या अपघातात दोघांचे प्राण गेले. रावसाहेब बढे हे अंबड तालुक्यातील प्रगतशील व अग्रेसर शेतकरी होते. दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.