मुंबई, 4 मे: ओडिशाला फानी चक्रीवादळाचा शुक्रवारी 3 मे रोजी तुफान तडाखा बसला. यामध्ये मालमत्तेचं मोठं नुकसान झालं. तर फानी चक्रीवादळ आता हळूहळू पश्चिम बंगालच्या दिशेनं सरकत असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 12 तासांत वाऱ्याचा वेग ताशी 90-115 किलोमीटर असेल अशी शक्यता व्य़क्त केली आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्याजवळील भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मच्छमारांना समुद्रात न जाण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे.
ओडिशातल्या 'कासवां'ना आधीच मिळाली होती 'फानी' चक्रीवादळाची चाहुल!
आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरातही वादळी वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आसाम आणि मेघालय भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.H
एका बाजूला फानीचा तडाखा आणि पाऊस आहे तर इकडे विदर्भात आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. विदर्भात वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाईचा तीव्र झळा बसत आहेत. 7 ते 9 मे रोजी नागपूरचे तापमानं 46 अंशापेक्षा अधिक असण्याची चिन्हं आहेत. तर चंद्रपुरात तापमान 48 डिग्रीपर्यंत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
काळजात धडकी भरवणारे फानी वादळाचे 15 VIDEO