प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, थोडक्यात बचावले

प्रसिद्ध गायक आनंद शिंदेंच्या गाडीला पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात, थोडक्यात बचावले

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे.

  • Share this:

पुणे, 27 ऑगस्ट : प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात आनंद शिंदे थोडक्यात बचावले असून यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. पण त्यांच्या गाडीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबईहून सांगोल्याच्या दिशेनं जात असताना इंदापूरजवळ त्यांच्या गाडीचा अपघात झाला.  इंदापूरमधील खासगी दवाखान्यात उपचार घेऊन शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले आहेत. मंगळवारी (27 ऑगस्ट) पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळील वरकुटे येथील ही घटना आहे.

आनंद शिंदे यांच्यासह आणखी तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद शिंदे हे रात्रीच्या सुमारास मुंबईहून सांगोल्याकडे जात होते. यादरम्यान वरकुटे फाट्याजवळ पोहोचल्यानंतर शिंदेंच्या गाडी चालकाला डम्पर दिसला नाही. त्यांच्या चालकाने डंपरला पाठीमागून धडक दिल्यानं अपघात झाला.

VIDEO : धावत्या रिक्षातून विद्यार्थी फेकला गेला बाहेर, तोच उठून पळाला मागे

Published by: Akshay Shitole
First published: August 27, 2019, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading