मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

3 महिन्यांच्या बाळासह आलेल्या सुनेला नाही घेतलं घरात; चिमुकल्याला दूधही नाही दिलं

3 महिन्यांच्या बाळासह आलेल्या सुनेला नाही घेतलं घरात; चिमुकल्याला दूधही नाही दिलं

कोरोनाच्या भीतीमुळे तीन महिन्यांच्या बाळासह दारात आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींनी घरात घेण्यास नकार दिला.

कोरोनाच्या भीतीमुळे तीन महिन्यांच्या बाळासह दारात आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींनी घरात घेण्यास नकार दिला.

कोरोनाच्या भीतीमुळे तीन महिन्यांच्या बाळासह दारात आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींनी घरात घेण्यास नकार दिला.

  • Published by:  Suraj Yadav

सावंतवाडी, 16 एप्रिल : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तसंच कोरोनाच्या धास्तीमुळे लोक इतरांशी संपर्क टाळत आहेत. दरम्यान सावंतवाडी तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवी मुंबई इथून तीन महिन्यांच्या बाळासह आलेल्या सुनेला सासरच्या मंडळींनी घरात घेण्यास नकार दिला. पती भारतीय सैन्यात असून ती नवी मुंबई इथं राहत होती. गावी आल्यानंतर तिला घरी न घेतल्यानं जिल्हा रुग्णालयात क्वारंटाइन होण्याची वेळ आहे. याबाबत तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी माहिती दिली आहे.

याबद्दल मिळालेली माहिती अशी की, नवी मुंबईत राहत असलेली एक महिला तिच्या तीन महिन्यांच्या बाळासह गावी जाण्यासाठी निघाला. यासाठी तिने पोलिसांचीही परवानगी घेतली होती. पती सैन्यात असल्यानं तिला गावात सोडण्यासाठी पोलिस आले होते. मात्र कुटुंबियांनी तिला घरात घेण्यास नकार दिला. तेव्हा पोलिसांनी संबंधित महिलेला उपजिल्हा रुग्णालयात आणलं. त्यानंतर ओरोस इथल्या जिल्हा रुग्णालयात महिलेला क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

पती गावी नसल्यानं घरी जाण्याचा निर्णय गेतलेल्या महिलेला घरच्याच मंडळींनी अशी वागणूक दिल्याची ही धक्कादायक घटना आहे. याबद्दल तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितलं की, महिला घरी आली पण तिला घरी घेतलं नाही. इतकंच काय तीन महिन्यांच्या बाळाला दूध तापवून देण्यासही घरच्यांनी नकार दिला अशीही माहिती तहसीलदारांनी दिली.

हे वाचा : रस्त्यावर पडल्या होत्या नोटा, घाबरलेल्या लोकांनी केला पोलिसांना फोन, पाहा VIDEO

देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहेत. यामुळे सुरुवातीला करण्यात आलेला 21 दिवसांचा लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोनावर कोणताच उपचार नसल्यानं लोकांना सोशल डिस्टन्सिंगच पालन करण्यास आणि घरीच राहण्यास सांगितलं जात आहे.

हे वाचा : कोरोनाच्या संकटात दिसला दानशूर महाराष्ट्राचा चेहरा; 15 दिवसात जमले 245 कोटी

संपादन - सूरज यादव

First published:

Tags: Coronavirus