अंबरनाथ, 19 डिसेंबर: आजच्या युगात प्रसिद्धीसाठी केव्हा कोण काय करेल, याचा नेम नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी नगरमध्ये एका पाळीव श्वानाचे चक्का डोहाळे पुरवण्यात आलं. मोठ्या थाटात ल्युसी नामक श्वानाचं डोहाळं जेवण करण्यात आलं होतं. आता अशीच एक घटना समोर आली आहे.
आतापर्यत श्वानाला वाढदिवसाच्या (Puppys Birthday) शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आल्याचं तुम्ही पाहिलं असेल. मात्र, अंबरनाथमध्ये (Ambarnath) एका पाळीव श्वानाचा चक्क केक कापून मोठ्या धुमधडाक्यात बर्थ डे (Birthday) अर्थात वाढदिवस साजरा करताना आला आहे.
हेही वाचा...महापमहापौर-उपमहापौरांच्या खुर्चीवरून शिवसेना आणि रिपाइंत जुंपलीसध्या या श्वानाच्या वाढदिवसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अंबरनाथच्या कैलास नगर भागातील असल्याचं बोललं जात आहे. 'चेरी' नावाचा हा पाळीव श्वान आता एक वर्षांचं झालं आहे. त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सोशल मीडियावरील माहितीनुसार, अंबरनाथमधील एका कुटुंबाने आपल्या घरातील पाळीव चेरी नावाच्या श्वानाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा केला. या श्वानाच्या वाढदिवसासाठी जंगी पार्टी देखील आयोजित करण्यात आली होती. नाचण्यासाठी डीजेची व्यवस्था आलेल्या पाहुण्यांना जेवण आणि एक दमदार सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. इतकंच काय तर ज्या भागात हा वाढदिवस साजरा झाला त्या परिसराची सजावट देखील करण्यात आली होती.
चर्चा तर होणारच! कुठे श्वानाचं डोहाळं जेवण तर कुठे धुमधडाक्यात बर्थ डे.. पाहा VIDEO pic.twitter.com/CkLtI1Z6C1
हेही वाचा...मोबाईल टॉवर लावण्याच्या नावाखाली लावला लाखो रुपयांचा चुना; आरोपी गजाआड
या वाढदिवसासाठी परिसरातील बच्चे कंपनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच वाढदिवसानिमित्त संपूर्ण परिसराची रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. या वाढदिवसाचे फोटो आणि व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांच्या त्यावर प्रतिक्रिया देखील येत आहे. त्यामुळे ऐकावं आणि पाहावं ते नवलच असं म्हणण्याची वेळ आहे. म्हणतात ना हौसेला मोल नाही, तेच खरं, मात्र हौस भागवण्यासाठी पैसा देखील असावा लागतो हेही तितकंच खरं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.